मुंबई प्रतिनिधी | महेंद्रसिंग धोनीच्या बॅटमध्ये ती जुनी जादू राहिली नाही. त्यामुळे धोनी पहिल्या सारखा करिष्मा करू शकत नाही. तसेच सेमी फायनलमध्ये न्यूझीलंड करून दारुण पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात धोनी धीम्या गतीने खेळला म्हणून त्याच्यावर चहूबाजूने टीकेचा वर्षाव केला जातो आहे. अशा अवस्थेत बीसीसीआय कडून देखील धोनीला निवृत्तीसाठी दबाव टाकला जाण्याची शक्यता आहे.
माजी आमदार मोहितेंच्या अटकेबद्दल राजगुरूनगरमध्ये शांततेसह दबक्या आवाजात चर्चा
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय क्रिकेट संघ निवड समितीचे संचालक एमएसके प्रसाद धोनीला त्याच्या खराब खेळाचे स्पष्टीकरण मागणार आहेत. त्यावेळी त्याला निवृत्ती घेण्याच्या सूचना रीतसर दिल्या जाणार आहेत. धोनीने निवृत्ती घेतली नाही तर त्याला निवृत्ती घेण्यासाठी दबाव टाकला जाईल. तसेच येणाऱ्या सामन्यांमध्ये त्याला संघातून बाहेर ठेवले जाईल. टी २०-२० चा विश्वचषक देखील त्याला खेळू दिला जाणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाजपचे ओळखपत्र दाखवल्यास टोल माफ होतो ; आमदाराचा खळबळजनक दावा
धोनी आपल्या चांगल्या खेळाचे सातत्य राखू शकला नाही. तर वृषभ पंत धोनीचे संघातील स्थान घेण्यासाठी रांगेत उभाच आहे. धोनीला उत्तम पर्याय असल्याने त्याला निर्वाणीचा इशारा दिला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान सेमी फायनलमध्ये धोनीने केलेल्या खराब खेळाबद्दल सचिन तेंडुलकर यांनी देखील धोनीवर टीका केली आहे.
महाजनांच्या त्या वक्तव्याने आमदार घोलपांचा जीव भांड्यात पडला