पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमने विराट कोहलीचा ‘तो’ रेकॉर्डदेखील मोडला

0
75
Babar Azam And Virat Kohli
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तो सध्या आपल्या खेळीने अनेक रेकॉर्ड मोडत आहे. सध्या त्याने पुरुषांच्या आयसीसी टी 20 रँकिंगमध्ये एक नवीन रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. टी 20 क्रिकेटच्या आयसीसी रॅकिंगमध्ये सर्वोच्च काळ अव्वल स्थानावर रहाण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे. बाबर आझमने (Babar Azam) भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा मागच्या दशकातील 1013 दिवस टी 20 रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर रहाण्याचा विक्रम मोडला आहे.

विराट टॉप 20 मध्येसुद्धा नाही
आयसीसीच्या टी 20 क्रमवारीत 21 व्या स्थानावर आहे. यावर्षी विराट फक्त दोन टी 20 सामने खेळला आहे. विराटचा सध्या क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये संघर्ष सुरु आहे. त्याच्या बॅट मधून धावा जणू आटल्या आहेत. विराटला सूर कधी गवसणार? हाच क्रिकेट चाहत्यांना पडलेला प्रश्न आहे. मागच्या दोन वर्षात त्याला एकही शतक झळकावता आलेलं नाही. या क्रमवारीत 818 रेटिंग पॉइंटसह बाबर आझम (Babar Azam) पहिल्या स्थानावर आहे तर पाकिस्तानचाच विकेटकीपर फलंदाज मोहम्मद रिझवान 794 रेटिंग पॉइंटसह दुसऱ्या स्थानावर आहे.

इशान किशनच्या क्रमवारीत घसरण
आयसीसीच्या टी 20 क्रमवारीत पहिल्या 10 जणांमध्ये फक्त इशान किशनचा समावेश आहे. मात्र आता इशान किशनच्या क्रमवारीत घसरण झाली आहे. तो 6 व्या क्रमांकावरुन सातव्या स्थानावर आला आहे. इशान किशनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संपलेल्या टी 20 सीरीजमध्ये दमदार कामगिरी केली. त्याने दोन अर्धशतकं झळकावली. पण आयर्लंड विरुद्धच्या दोन टी 20 सामन्यात त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले आहे.

हे पण वाचा :
शिवसैनिक आक्रमक!! श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय फोडले

आम्ही शिवसेनेचेच सदस्य, काँग्रेस- राष्ट्रवादीनेच सेनेला हायजॅक केलं

हिंमत असेल तर स्वतःच्या बापाच्या नावाने मतं मागा; मुख्यमंत्र्यांचा शिंदेवर हल्लाबोल

साताऱ्यात आ. शंभूराज देसाई यांच्या विरोधात आंदोलन

मुंबईत 10 जुलै पर्यंत जमावबंदी लागू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here