हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICICI Bank : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत 5 वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता ICICI Bank ने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या व्याजदरात वाढ केली आहे.
16 डिसेंबर 2022 पासून नवीन दर लागू
ICICI Bank च्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, हे नवीन दर 16 डिसेंबर पासून लागू आहेत. आता बँकेने 46 दिवसांपेक्षा जास्त कालावधीच्या एफडीवरील व्याजात वाढ केली आहे. याशिवाय 1 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या FD वर 0.50 टक्के व्याज वाढवण्यात आले आहे. तसेच बँक ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त 7.50 टक्के व्याज देत आहे.
ICICI Bank चे नवीन एफडी दर
कालावधी सामान्यनागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना
7 दिवस ते 14 दिवस 3.00% 3.50%
15 दिवस ते 29 दिवस 3.00% 3.50%
30 दिवस ते 45 दिवस 3.50% 4.00%
46 दिवस ते 60 दिवस 4.00% 4.50%
61 दिवस ते 90 दिवस 4.50% 5.00%
91 दिवस ते 120 दिवस 4.75% 5.25%
121 दिवस ते 150 दिवस 4.75% 5.25%
151 दिवस ते 184 दिवस 4.74% 5.25%
185 दिवस ते 210 दिवस 5.50% 6.00%
211 दिवस ते 270 दिवस 5.50% 6.00%
271 दिवस ते 289 दिवस 5.50% 6.00%
290 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी 5.75% 6.25%
1 वर्ष ते 389 दिवस 6.60% 7.10%
390 दिवस ते 15 महिन्यांपेक्षा कमी 6.60% 7.10%
15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी: 7.00% 7.50%
18 महिने ते 2 वर्षे 7.00% 7.50%
2 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षे 7.00% 7.50%
3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे 7.00% 7.50%
5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे 6.90 % 7.50%
अनेक बँकांनी FD चे दर वाढवले आहेत
अलीकडेच इंडियन ओव्हरसीज बँक, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, येस बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
RBI कडून रेपो दरात वाढ
अलीकडेच, RBI ने डिसेंबरच्या धोरणात रेपो दरात आणखी 0.35 टक्क्यांनी वाढ आहे. या दरवाढीनंतर, रेपो दर आता 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. ICICI Bank
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.icicibank.com/Personal-Banking/account-deposit/fixed-deposit/fd-interest-rates.page
हे पण वाचा :
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू Lionel Messi ची एकूण संपत्ती किती ??? त्याविषयीची माहिती जाणून घ्या
FD Rates : ‘या’ बँकेच्या FD वर मिळेल 8.80% पर्यंत व्याज, इतर बँकांचे व्याजदर तपासा
Gold Price : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती
Recharge Plan : फक्त 225 रुपयांमध्ये ‘ही’ कंपनी देत आहे अनलिमिटेड व्हॅलिडिटी
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना मिळणार नवीन वर्षाची भेट, खात्यामध्ये पाठवले जाणार इतके रुपये