हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICICI Bank : RBI ने नुकतीच रेपो दरात वाढ केली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांकडून आपल्या डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. हे लक्षात घ्या कि, कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँका डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ करत आहेत. या दरम्यानच आता ICICI Bank ने 2 कोटींपेक्षा जास्त मात्र 5 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या FD वरील व्याजदरात बदल केला आहे. 15 ऑक्टोबर 2022 पासून हे नवीन दर लागू केले जाणार आहेत.
या बदलानंतर, आता ICICI Bank 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर 3.75 टक्के ते 6.25 टक्के पर्यंत व्याजदर देत आहे. त्याच वेळी, बँक एफडीवर जास्तीत जास्त 6.50 टक्के व्याजदर देत आहे, जे 3 वर्षांच्या FD वर उपलब्ध असेल.
FD वरील नवीन व्याजदर
आता ICICI Bank 7 ते 29 दिवसांच्या FD वर 3.75 टक्के तर 30 ते 45 दिवसांच्या FD वर 4.75 टक्के व्याजदर देईल. तसेच 46 ते 60 दिवसांच्या FD वर 5.00% आणि 61 ते 90 दिवसांच्या FD वर 5.25% दराने व्याज दर मिळेल.
जास्तीत जास्त 6.50% व्याजदर मिळेल
ICICI Bank कडून आता 91 दिवस ते 184 दिवसांच्या FD वर 5.50% आणि 185 दिवस ते 270 दिवसांच्या FD वर 5.75% व्याज दिले जाईल, तर 271 दिवस किंवा एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6%, एक वर्ष आणि 389 दिवसांच्या FD वर 6.50% तसेच 390 दिवस ते 2 वर्षांच्या FD वर 6.45% आणि पुढील 2 वर्ष 1 दिवस ते 3 वर्षांच्या FD वर 6.50% व्याजदर दिला जाईल.
ज्येष्ठ नागरिकांना मिळेल अतिरिक्त व्याज
ICICI Bank कडून ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल FD प्रोग्रॅम चालविला जातो आहे. या गोल्डन इयर्स FD ची एक्सपायरी डेट देखील 30 सप्टेंबर 2022 ते 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. या गोल्डन इअर्स प्रोग्रॅम अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या अतिरिक्त व्याजदरामध्ये 0.10% वाढ करण्यात आली आहे. ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना बँकेतील 5 वर्षे, 1 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर 0.50% अतिरिक्त व्याज दर दिला जात आहे.
ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याजदर मिळेल
ICICI Bank आता 5 वर्षात, 1 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीच्या FD वर 6.00% व्याजदर देते. ज्येष्ठ नागरिकांना आता 6.60% व्याजदर मिळेल, जो स्टॅण्डर्ड दरापेक्षा 60 बेसिस पॉईंट्स जास्त आहे.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.icicibank.com/personal-banking/deposits/fixed-deposit/fd-interest-rates
हे पण वाचा :
Train Cancelled : रेल्वेकडून 184 गाड्या रद्द, अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत घसरण तर चांदीच्या दरात वाढ
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 23 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा फ्री कॉलिंग अन् डेटा !!!
WhatsApp वर लवकरच मिळणार ‘हे’ 5 जबरदस्त फिचर्स, त्याविषयी जाणून घ्या
Dhanteras 2022 : धनत्रयोदशीला सोने खरेदी करताय? पहा काय आहे यासाठीचा शुभ मुहूर्त