हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICICI Bank : शुक्रवारी RBI कडून रेपो दरात 50 बेसिस पॉईंट्सने वाढ करण्यात आली. ज्यानंतर रेपो दर 5.40 टक्क्यांवरून 5.90 टक्क्यांवर आला आहे. या दर वाढीनंतर आता बहुतेक बहुतांश बँकांनी आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये खासगी क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक असलेल्या ICICI बँकेचा देखील समावेश आहे. आता या बँकेच्या ग्राहकांना एफडीवर जास्त व्याज दिले जाणार आहे. याशिवाय, बँकेकडून 30 सप्टेंबर रोजी ‘गोल्डन इयर्स एफडी’ योजना देखील लाँच केली गेली आहे.
ICICI Bank कडून 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली गेली आहे. आता ICICI Bank च्या FD वर 3.00% ते 6.10% पर्यंत व्याज मिळेल. 30 सप्टेंबर 2022 पासून हे नवीन व्याजदर लागू झाले आहेत.
FD वर किती व्याज मिळेल ते जाणून घ्या
7 ते 29 दिवस – 3.00%
30 ते 90 दिवस – 3.50%
91 ते 184 दिवस – 4.25%
185 दिवस ते 1 वर्ष – 4.90%
1 वर्ष ते 2 वर्षे – 5.70%
2 वर्षे ते 3 वर्षे – 5.80%
3 वर्षे ते 5 वर्षे – 6.10%
5 वर्षे ते 10 वर्षे – 6.00%
ICICI Bank ची स्पेशल एफडी
हे लक्षात घ्या कि, 30 सप्टेंबर रोजी ICICI Bank कडून ‘गोल्डन इयर्स एफडी’ लाँच करण्यात आली आहे. यामध्ये ग्राहकांना 6 ऑक्टोबरपर्यंत गुंतवणूक करता येईल. या नवीन FD मध्ये अतिरिक्त व्याज मिळेल. ही एक मर्यादित कालावधीची FD आहे. जिचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 0.10 टक्के अतिरिक्त व्याज दिले जाईल. हे व्याज त्यांना आधीच देण्यात येत असलेल्या 0.50 टक्के अतिरिक्त व्याजाच्या वर असेल.
हे जाणून घ्या कि, ICICI Bank कडून ज्येष्ठ नागरिकांना 2 कोटी रुपयांपेक्षा कमी आणि 5 ते 10 वर्षांच्या FD वर 6.60 टक्के व्याज दिले जाते. याचा अर्थ ज्येष्ठ नागरिकांना यामध्ये 6.70 टक्के व्याज मिळेल.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.icicibank.com/Personal-Banking/account-deposit/fixed-deposit/fd-interest-rates.page
हे पण वाचा :
HDFC चा ग्राहकांना झटका !!! होम लोनवरील व्याजदरात केली 0.50 टक्क्यांनी वाढ
RBI च्या रेपो वाढीचा थेट परिणाम आपल्या खिशावर कसा होणार ते समजून घ्या
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत आज झाली वाढ, पाहा ताजे दर
पापणी लवायच्या आत 4 मजली इमारत झाली जमीनदोस्त
Gold Investment : सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे का??? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात