हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICICI Bank : RBI ने रेपो दरात नुकतीच वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर अनेक बँकांकडून आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली. आता ICICI Bank ने देखील आपल्या 2 लाख रुपयांपासून ते 5 कोटी रुपयांपर्यंतच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे. हे नवीन व्याजदर 26 ऑगस्ट 2022 पासून लागू करण्यात आले आहेत.
आता ICICI Bank कडून 7 दिवस ते 29 दिवसांच्या एफडीवर 3.50 टक्के व्याज दिले जाईल. त्याचप्रमाणे, 30 ते 45 दिवसांच्या एफडीवर 3.60 टक्के, 46 ते 60 दिवसांच्या एफडीवर 4 टक्के तर 61 ते 90 दिवसांच्या एफडीवर 4.75 टक्के व्याज दिले जाईल. त्याचप्रमाणे, आता बँक 91 ते 184 दिवसांच्या एफडीवर 5.25 टक्के व्याज देईल.
‘या’ FD वर मिळेल जास्त व्याज
याशिवाय ICICI Bank कडून 185 ते 270 दिवसांच्या एफडीवर 5.40 टक्के तर 271 दिवस ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 5.60 टक्के व्याज दिले जाईल. तसेच एक वर्ष ते 5 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 6.05 टक्के आणि 1 दिवस ते 10 वर्षांपर्यंत 5 वर्षांच्या एफडीवर 5.90 टक्के व्याज मिळणार आहे.
19 ऑगस्ट रोजी देखील वाढवले होते व्याज
हे लक्षात घ्या की, 19 ऑगस्ट रोजी देखील ICICI Bank कडून FD वरील व्याजदरात वाढ करण्यात आली होती. बँकेच्या वेबसाइटनुसार, बँकेने डोमेस्टिक, NRO आणि NRI डिपॉझिट्ससाठी FD व्याजदरात वाढ केली आहे. आता बँक 3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षांच्या FD वर सर्वसामान्य ग्राहकांना 6.10 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 6.60 टक्के व्याज देईल.
19 ऑगस्टनंतर ICICI Bank कडून सामान्य ग्राहकांना 6.05 टक्के दराने व्याज दिले जात आहे. यानंतर आता बँक 18 महिने ते 2 वर्ष मुदतीच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 6.05 टक्के व्याज देईल. तसेच 2 वर्ष 1 दिवस ते 3 वर्षांच्या मुदतीच्या FD वर, सामान्य ग्राहकांना 6.05 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 6.05 टक्के व्याज देईल. 3 वर्ष 1 दिवस ते 5 वर्षांच्या मुदतीच्या FD वर, बँक सामान्य ग्राहकांना 6.05 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 6.05 टक्के व्याज मिळेल. तसेच 5 वर्ष 1 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीच्या FD वर सामान्य ग्राहकांना 5.90 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 5.90 टक्के व्याज मिळेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.icicibank.com/interest-rates.page
हे पण वाचा :
Loan : एखाद्याच्या कर्जासाठी जामीनदार होण्यापूर्वी जाणून घ्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी !!!
Dhanlaxmi Bank ने FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन व्याजदर तपासा
Business Idea : वर्षभर मागणी असलेल्या ‘या’ ड्रायफूटची लागवड करून मिळवा करोडो रुपये !!!
Lamborghini Huracan Tecnica : लॅम्बोर्गिनीने लॉन्च केली जबरदस्त कार; ताशी 325 किमी स्पीड
Post Office च्या ‘या’ विमा पॉलिसीमध्ये 299 रुपयांमध्ये मिळेल 10 लाखांचे विमा संरक्षण !!