हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (ICICI Bank) विविध आर्थिक उत्पादने आणि सेवांसाठी ओळखली जाणारी ICICI बँक ही खाजगी क्षेत्रातील आघाडीची बँक आहे. ही बँक कायम आपल्या ग्राहकांसाठी विविध योजना राबवत असते. त्यामुळे ICICI बँकेच्या ग्राहकांची मोठी संख्या आहे. जर तुम्हीही ICICI बँकेचे ग्राहक असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे. ICICI बँकेने काही सेवांचे शुल्क वाढवले असून सुधारित दर येत्या १ मे २०२४ पासून लागू होणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना वाढलेले दर बँकेला भरावे लागणार आहेत. याविषयी सविस्तर माहिती घेऊया.
कोणत्या सेवांचे दर वाढणार? (ICICI Bank)
ICICI बँकेने आपल्या IMPS, चेकबुक, डेबिट कार्ड वार्षिक शुल्क, व्याज प्रमाणपत्र, शिल्लक प्रमाणपत्र, पत्ता पडताळणी आणि इतर अनेक सेवा शुल्कांमध्ये बदल केल्याचे समजत आहे. त्यामुळे आता ग्राहकांना या सेवांचा लाभ घ्यायचा असेल तर पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
कोणत्या सेवांसाठी किती दर असेल?
याबाबत ICICI बँकेने आपल्या अधिकृत वेबसाइटद्वारे माहिती शेअर केली आहे. ज्यामध्ये सांगितलं आहे की, डेबिट कार्डसाठी वार्षिक शुल्क पूर्वीपेक्षा जास्त असेल. (ICICI Bank) शहरी भागात २०० रुपये तर ग्रामीण भागात ९९ रुपये असे सुधारित दर करण्यात आले आहेत. दरम्यान २५ चेकचे बुक घेण्यासाठी ग्राहकांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. मात्र याहून अधिक चेकचे बुक हवे असल्यास प्रति चेक ४ रुपये जादा आकारले जातील.
याशिवाय डीडी किंवा पीओ रद्द केल्यास वा डुप्लिकेट पुनर्प्रमाणित करायचे असल्यास १०० रुपये दर आकारला जाईल. (ICICI Bank) तसेच IMPS द्वारे पैसे हस्तांतरित करायचे असतील तर १ हजार रुपयांची रक्कम हस्तांतरित केल्यास तुम्हाला प्रति व्यवहार २.५० रुपये मोजावे लागतील.
ICICI खातेधारकांना १ रुपये ते २५ हजार रुपये ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला ५ रुपये तर २५ हजार ते ५ लाख रुपयांच्या व्यवहारासाठी तुम्हाला १५ रुपये शुल्क आकारावे लागेल. आत्तापर्यंत ही सुविधा मोफत दिली जात होती. मात्र यावर आता दर लागू करण्यात आले आहेत. (ICICI Bank) याशिवाय स्वाक्षरी पडताळणी वा प्रमाणीकरणासाठीदेखील प्रति व्यवहार १०० रुपये दर आकारला जाणार आहे. इतकेच नव्हे तर ECS/NACH डेबिट कार्ड रिटर्नवर ग्राहकांना ५०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. शिवाय स्टॉप पेमेंट चार्जवर १०० रुपये आकारले जातील.