लॉकडाउन नसता तर देशात हाहा:कार माजला असता! अहवालातून धक्कादायक माहिती उघड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाउन लागू करण्यात आला. हा लॉकडाउन जर लागू केला नसता तर भारतात कोरोनाने हाहाकार माजला असता असं निरीक्षण आयसीएमआर (Indian Council of Medical Research ) या संस्थेनं आपल्या एका निरीक्षणात म्हटलं आहे. आयसीएमआरने आपल्या अहवालात भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउनचा निर्णय फायद्याचं ठरलं असल्याचे सांगितलं आहे. देशात लॉकडाउन जर लागू नसता तर १५ एप्रिलपर्यंत देशात कोरोनाबाधितांची संख्या लाखांच्या घरात गेली असती. अशी बाब आयसीएमआरच्या लॉकडाउनविषयीच्या अभ्यासातून उघड झाली आहे.

आयसीएमआरने आपल्या अहवालात केंद्र सरकारला देशात लोकडाऊन वाढविणे किती आवश्यक आहे हे सांगितलं आहे. त्यासाठी आयसीएमआरने आपल्या अहवालात एक आकडेवारी दिली आहे. त्यानुसार, १५ एप्रिलपर्यंत जर लॉकडाऊन नसता तर, देशात ८ लाख २० हजार कोरोनाग्रस्त असते. सध्या देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा ६ हजारापर्यंतच सीमित राहिला आहे. त्यामुळं भयभीत होण्याचं कारण नाही असं आयसीएमआरने म्हटलं आहे. मात्र, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन वाढवणं गरजेचं असल्याचे आयसीएमआरने आपल्या वैज्ञानिक अभ्यासात नमूद केलं आहे.

पुढच्या ४ दिवसात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची मुदत संपत आहे. अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवावा अशी केंद्राला विनंती केली आहे.तसेच अनेक तज्ञ सुद्धा कोरोनावर नियंत्रणात जाण्यासाठी लॉकडाऊन वाढवला जावा अशी शिफारस करत आहेत. अशा वेळी लॉकडाऊन वाढवला जावा या मागणीला पाठबळ देणारा अभ्यास आयसीएमआरच्या माध्यमातून समोर आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

या बातम्याही वाचा –

Leave a Comment