हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IDFC First Bank : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत चार वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता खाजगी क्षेत्रातील IDFC First Bank ने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे.
1 डिसेंबर 2022 पासून नवीन दर लागू
IDFC First Bank च्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, हे नवीन दर 1 डिसेंबर 2022 पासून लागू होणार आहेत. या बदलानंतर ग्राहकांना बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर 3.50% ते 6.00% पर्यंत व्याज दर देत आहे.
बँक ज्येष्ठ नागरिकांना 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD साठी 0.75% किंवा 75 bps जास्त व्याज दर देते. बंधन बँकेचे सध्याचे ग्राहक रिटेल इंटरनेट बँकिंग किंवा mBandhan मोबाइल अॅपद्वारे एफडी बुकिंग किंवा गुंतवणूकीचा लाभ घेऊ शकतात. या ऑनलाइन प्रक्रियेमुळे ग्राहक कोणत्याही त्रासाशिवाय त्वरित FD बुक करू शकतात.
IDFC First Bank च्या एफडीवरील नवीन दर
आता IDFC First Bank कडून 7 ते 29 दिवसांच्या FD वर 3.50% तर 30 ते 90 दिवसांच्या FD वर 4.00% व्याजदर दिला जाईल आहे. त्याच बरोबर 91 ते 180 आणि 181 ते 364 दिवसांच्या FD वर अनुक्रमे 4.50% आणि 6.00% व्याजदर मिळेल. आता 365 दिवस ते 500 दिवसांच्या FD वर 6.50% आणि 501 दिवस ते 749 दिवसांच्या FD वर 6.75% व्याज मिळेल.
त्याच प्रमाणे 750 दिवसांच्या FD वर बँकेकडून 7.25% आणि 751 दिवस ते 5 वर्षाच्या FD वर 6.50% व्याजदर दिला जाईल. तसेच 5 वर्षे – 1 दिवस – 10 वर्षांच्या FD वर 6.00%आणि 5 वर्षांच्या टॅक्स सेव्हिंग FD वर 6.50% व्याज दर मिळेल.
अनेक बँकांनी FD चे दर वाढवले आहेत
अलीकडेच CSB बँक लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, RBL बँक, Axis बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
रेपो रेट गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर
अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.idfcfirstbank.com/personal-banking/deposits/fixed-deposit/fd-interest-rates
हे पण वाचा :
EPFO च्या EDLI स्कीमअंतर्गत अशा प्रकारे मिळवा 7 लाख रुपयांचा फ्री इन्शुरन्स
Multibagger Stock : ‘या’ केमिकल स्टॉकने एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला साडेतीन पट रिटर्न !!!
FD Rates : ‘या’ बँका FD वर देत आहेत जास्त रिटर्न, व्याज दर तपासा
आता फक्त एका कॉलमध्ये घरबसल्या अशा प्रकारे अपडेट करा Aadhaar Card !!!
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 100 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी आपल्या ट्रेनचे स्टेट्स तपासा