हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IDFC First Bank : सध्याच्या काळात देशभरात क्रेडिट कार्डचा ट्रेंड चांगलाच वाढल्याचे दिसून येत आहे. अगदी रिचार्ज आणि बिल भरण्यापासून ते खरेदीपर्यंत सर्व कामांसाठी लोकांकडून क्रेडिट कार्ड वापरले जाते आहे. आता तर अनेकजण घराचे भाडे भरण्यासाठी देखील क्रेडिट कार्डने वापरत आहेत. Paytm, Credit (CRED), Nobroker, Payzapp, RedGirraffe सारख्या अनेक प्लॅटफॉर्मने देखील क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरणे फायद्याचे बनवले आहे.
मात्र, आता लोकांना असे करणे महागात पडणार आहे. कारण, आता IDFC First Bank च्या क्रेडिट कार्डधारकांना बँकेकडून एक मोठा धक्का देण्यात आला आहे. कारण कंपनीने नुकतेच क्रेडिट कार्डद्वारे भाडे देयकांवर 1 टक्के शुल्क आकारले जाणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच 3 मार्च, 2023 पासून हा नियम लागू होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे. हे जाणून घ्या कि, याआधी देखील SBI, ICICI Bank आणि Bank Of Baroda कडून रेंट पेमेंट वरील शुल्क वाढवण्यात आले आहेत.
आतापर्यंत आकारले जात होते फक्त ‘हे’ शुल्क
हे लक्षात घ्या कि, अशा प्रकारच्या ट्रान्सझॅक्शनसाठी आतापर्यंत Bank Of Baroda कडून कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. ज्यामुळे अनेक भाडेकरूंनी NoBroker, PayZap, Red Giraffe, Mobikwik, PhonePe, Paytm, Cred सारख्या प्लॅटफॉर्मवर रेसिपिएंटच्या पर्यायामध्ये घरमालकाच्या बँक खात्याचे डिटेल्स किंवा UPI ऍड्रेस एंटर करून क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केले. मात्र, या थर्ड पार्टी प्लॅटफॉर्म कडून क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्यासाठी कन्व्हिनिअन्स फी आकारली गेली. IDFC First Bank
SBI कार्ड आणि ICICI बँकेने देखील वाढवले शुल्क
याआधी, ICICI बँकेकडूनही आपल्या क्रेडिट कार्डधारकांकडून क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्यासाठी एक टक्का प्रोसेसिंग चार्ज आकारण्याची घोषणा करण्यात आली होती. 20 ऑक्टोबर 2022 पासून हा प्रोसेसिंग चार्ज लागू कऱण्यात आला आहे. त्याच वेळी, SBI कडूनही क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाते आहे. SBI आता क्रेडिटकार्डद्वारे भाडे भरण्यासाठी 99 रुपये + GST आकारत आहे. 15 नोव्हेंबर 2022 पासून SBI क्रेडिट कार्डचा हा बदल लागू झाला आहे. तसेच बँक ऑफ बडोदाकडून 1 फेब्रुवारी 2023 पासून क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या रेंट पेमेंटवर 1% शुल्क देखील आकारले जात आहे. IDFC First Bank
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.idfcfirstbank.com/finfirst-blogs/credit-card/how-to-pay-rent-with-credit-card
हे पण वाचा :
Bank FD : खाजगी क्षेत्रातील ‘या’ बँकेच्या FD वर मिळत आहे 7.40% पर्यंत व्याज !!!
BSNL च्या 184 रुपयांच्या प्लॅनमध्ये 395 दिवसांसाठी मिळवा ‘हे’ फायदे
PM Svanidhi Yojana : स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकार देत आहे विना गॅरंटी कर्ज, अशा प्रकारे मिळवा फायदा
Multibagger Stock : टाटा ग्रुपच्या ‘या’ शेअर्सने गेल्या 5 वर्षांत दिला जबरदस्त रिटर्न, गुंतवणूकदारांनी कमावले कोट्यवधी रुपये
Post Office Tax Saving Schemes : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 5 योजनांमधील गुंतवणूकीद्वारे वाचवता येईल टॅक्स