पुलवामा सारखा मोठा दहशतवादी हल्ल्याचा कट सुरक्षा दलांनी एका रात्री उधळून लावला; पहा व्हिडीओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

श्रीनगर । जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाने पुन्हा एकदा कारमध्ये आयईडी भरून बॉम्बस्फोट घडवण्याचा दहशतवादी कट उधळून लावला आहे. पुलवाम्यातील आइनगुंड परिसरात आयईडीने भरलेली एक सँट्रो कार सुरक्षा दलाने जप्त केली. या कारवर कठुआची नंबर प्लेट आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुलवामा पोलिसांना काल रात्री विश्वासार्ह माहिती मिळाली की स्फोटकांनी भरलेल्या कारने एक दहशतवादी फिरत आहे. बॉम्बस्फोट घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट असल्याची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आणि त्यांनी पोलिस आणि सुरक्षा दलाचे (एसएफ) रात्रीत सदर कार शोधून काढली. पुलवाम्यातील राजपोरा येथील आइनगुंडमधून ही कार जप्त करण्यात आली. या कारमध्ये मोठ्या प्रमाणात आयईडी होते. सुरक्षा दलाच्या पथकांवर हल्ला करण्याचा दहशतवाद्याचा कट होता अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे.

कारवर कठुआची नंबर प्लेट
या कारवर जेके-०८ १४२६ नंबरची प्लेट होती. हा कठुआचा नंबर आहे. कठुआचा हीरानगर हा परिसर पाकिस्तानी घुसखोराचा विचार करता अतिशय संवेदनशील मानला जातो. हे पाहता या कटामागे पाकिस्तानचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

पुलवामा हल्ल्यात अशाच कारचा वापर
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे १४ फेब्रुवारी २०१९ मध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर मोठा दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. पुलवाम्यातील अवंतीपोरा येथे झालेल्या या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी आयईडीने भरलेल्या अशाच एका कारचा वापर केला होता. ही कार सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर धडकली होती.

 

Leave a Comment