नवी दिल्ली । सध्याच्या काळात आधार कार्ड हे एक महत्त्वाचे डॉक्युमेंट्स बनले आहे. त्याशिवाय बरीच कामे रखडली जातात. मात्र, जर तुमचे आधार कार्ड हरवले असेल तर आता काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही ते सहजपणे डाउनलोड करू शकाल. काही सोप्या स्टेप्स फॉलो केल्यानंतर तुम्ही ते घरबसल्या डाउनलोड करू शकता.
UIDAI म्हणजेच यूनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया द्वारे जारी केलेले आधार कार्ड हे देशातील सर्व नागरिकांसाठी खूप महत्वाचे आहे. याचा वापर बँक खाते उघडण्यासाठी, शाळेत प्रवेश घेण्यासाठी आणि इतर सर्व सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी केला जातो.
अशाप्रकारे डाउनलोड करा
आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी, तुम्हाला पहिले अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जावे लागेल.
यानंतर तुम्हाला Download Aadhaar च्या Get Aadhaar पर्यायावर जावे लागेल.
आता तुम्हाला येथे 12 अंकी आधार नंबर देखील टाकावा लागेल. तुमच्याकडे आधार नंबर उपलब्ध नसल्यास, तुम्हाला 16-अंकी व्हर्चुअल आयडेंटिफिकेशन नंबर (VID) एंटर करावा लागेल.
एकदा ती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपल्याला सिक्योरिटी कोड एंटर करावा लागेल.
त्यानंतर Send OTP वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल.
त्यानंतर OTP टाका आणि ‘Verify and download’ वर क्लिक करा.
यानंतर, आधार रीप्रिंट करण्यापूर्वी तुम्हाला ‘Preview Aadhaar Letter’ स्क्रीनवर दिसेल. तुमचे डिटेल्स दोनदा तपासा.
आता तुम्हाला पेमेंट पर्याय निवडावा लागेल आणि आता तुम्हाला PDF डाउनलोड करण्यासाठी तुमचे डिजिटल सिग्नेचर सबमिट करावा लागेल.
एकदा तुम्ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्ही तुमचा आधार सहजपणे डाउनलोड करू शकाल.