तर नंतर कुठलेही सरकार आलं तर २०-२५ वर्ष मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही – चंद्रकांत पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी कराडच्या कृष्णा हॉस्पीटल कोरोना उपचारांची पाहणी करुन 15 कोरोनामुक्त रुग्णाचा सत्कार करून डिस्चार्ज दिला. यावेळी माध्यमांशी बोलताना विनायक मेठेंनी मराठ्यांना दुजाभाव का असं पत्र लिहीलय…प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे सुनावणी सुरू आहे…तरी मराठा आंदोलन करण्याचा प्रयत्न होतोय…यामागचं राजकारण काय…??? या प्रश्नावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी मराठा समाजाच्या मनामध्ये भीती आहे. जर ही केस नीट चालली नाही, जर सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय विरोधी गेला तर नंतर कुठलेही सरकार आलं तर वीस पंचवीस वर्ष आरक्षण देता येणार नाही. त्यामुळे भितीने काही जण विनंती करतायत तर काही जण आंदोलन करतायत असे सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना आरक्षण देतांना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे स्पष्ट केलेय. मग ओबीसी नेत्यांमध्ये नाराजी का??? यावर देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय केला तेव्हा ही आपल्या आरक्षणावर गदा येईल असे ओबीसी नेत्यांना वाटले होते. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असा देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास दिला होता. मात्र आता भिती का वाटते ते सांगता येत नसलेचे चंद्रकांत दादांनी स्पष्ट केले.

भाजपाचे दुध आंदोलन मतलबी आहे या राजु शेट्टीच्या टिकेला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा यांनी यावेळी उत्तर दिले. मतलबी कोण आहे हे शेतकरी जाणतात आमचे आंदोलन शेतकऱ्यांना मतलबी वाटते का हे महत्त्वाचे असुनराजु शेट्टी काय म्हणतो याला काय महत्व आहे माध्यम प्रसिद्ध देतात म्हणून तो काही बोलतो माध्यमांच्या ही मनातुन शेट्टी उतरलेच आहेत शरद पवारां विरोधात आंदोलन केले त्यांचे घरी जेवायला जातात याला काय अर्थ आहे पवार सुता सारखे सरळ झाले कि हे शरण गेले असा सवालही केला.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.

ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

Leave a Comment