हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. ही रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार पुरेपूर प्रयत्न करत आहे. ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत राज्य सरकारनं संचारबंदी काल (14एप्रिल )रात्री 8 वाजल्यापासून लागू केली आहे. जीवनावश्यक गोष्टींकरिता मुभा देण्यात आली आहे. मात्र काही ठिकाणी नियमांचे पालन केले जात नाही आणि अनावश्यक गर्दी केली जात आहे अशा ठिकाणी आवश्यक सेवाही बंद करा अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला केल्या आहेत.राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे ही बैठक झाली. त्यावेळी त्यांनी अधिका-यांना कडक सूचना दिल्या.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले,’विवाह समारंभ हे कोरोना संसर्ग फैलावण्यास मोठ्या प्रमाणात जबाबदार असल्याचे दिसून आले आहे. त्यादृष्टीने सर्व नियम व्यवस्थित पाळले जातात की नाही हे जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने पाहावे, असे ठाकरे यांनी सांगितले. गेल्या वर्षीपेक्षा कोरोना संसर्गाचा वेग खूप जास्त आहे.
ऑक्सिजन आणि रेमडीसिव्हर साठी युद्धापातळीवर प्रयत्न
ऑक्सिजन उपलब्ध करून घेण्यासाठी आपण युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहोत. तसेच ऑक्सिजनचा उचित व योग्य वापर तसेच रेमडेसिविरसंदर्भात काळजीपूर्वक पावले उचलावी लागणार आहेत. तसेच जम्बो कोविड सेंटर येणारा पावसाळा, वादळवारे लक्षात घेऊन सुरक्षित आहेत की नाही हे तपासून घ्यावे. सर्व रुग्णालयांचे फायर ऑडीट तातडीने करून घ्यावे, यात कोणताही निष्काळजीपणा नको असे मुख्यमंत्री म्हणाले.
कोणताही अतिरेक नको
आपण लागू केलेल्या कठोर निर्बंधाचा मुख्य उद्देश्य हा कोरोनाची संसर्ग साखळी तोडणे हा आहे. कुठलाही अतिरेक किंवा विसंगत कृती करू नये, कोणतीही शंका असल्यास मंत्रालयाकडे तातडीने मार्गदर्शन मागावे, असे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page
Click Here to Join Our WhatsApp Group