प्रकाश आंबेडकर काँग्रेसमध्ये आले तर…, पृथ्वीराज चव्हाणांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| “वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) काँग्रेसमध्ये आले तर ते देशाचे नेते होतील” असे महत्त्वपूर्ण वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Pruthviraj Chavan) यांनी केले आहे. तसेच, “मागील लोकसभा निवडणुकीवेळी प्रकाश आंबेडकरांमुळेच काँग्रेसचे नऊ खासदार पडले त्यांच्या डोक्यात काय सुरू आहे हे पहावे लागेल” असे देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. चव्हाण यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आंबेडकर काँग्रेसमध्ये जाण्याचा विचार करतील का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

पत्रकारांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “प्रकाश आंबेडकर यांनीच व्यावहारिक मागणीद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान वाचवले आहे. जास्तीत जास्त लोक उभी करून काँग्रेसचे मतांमध्ये विभाजन करणे आणि उमेदवारांना पाडणं ही मोदींची स्टॅटीजी आहे. यामुळे राजू शेट्टी किंवा प्रकाश आंबेडकर, यांनी उमेदवार उभे केले तर फायदा आणि तोटा कोणाला होणार हे स्पष्ट आहे.”

त्याचबरोबर, “सध्या प्रकाश आंबेडकर यांच्या डोक्यामध्ये काय सुरू आहे हे मला आज जाऊन पाहता येणार नाही. परंतु मागच्या निवडणुकांमध्ये त्यांच्यामुळेच काँग्रेसचे नाव खासदार पडले हे खरे आहे. जर ते आमच्या सोबत आले नाही तर गेल्या वेळी केलं तोच प्रयत्न आहे का अशी शंका निर्माण होईल. मात्र मला वाटतं ते आमच्या सोबत येतील” असे देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

…ते देशाचे नेते होतील

इतकेच नव्हे तर, “प्रकाश आंबेडकर काँग्रेस सोबत आले तर पुढे जाऊन ते देशाचे नेते होतील. कारण देशांमध्ये आंबेडकर हे नाव दुसऱ्या कोणाकडेच नाही. प्रकाश आंबेडकर सर्वांना ओळखतात, त्यामुळे त्यांनी जाऊन म्हटले की मला यायचं आहे तर त्यांना कोण नाही म्हणणार नाही. त्यांनी मलिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिले आहे. मात्र ते एका प्रवक्त्याच्या नावाने लिहिलं आहे. त्यामुळे तो खरगेंचा अपमान आहे असं आम्हाला वाटतं” असा दावा देखील चव्हाण यांनी केला आहे.