मुंबई : हॅलो महाराष्ट्र – अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीवर सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. उद्धव ठाकरे गटाने ऋतुजा लटके (Rituja Latke) यांना उमेदवारी देण्याचे पक्के केले आहे. पण ऋतुजा लटके (Rituja Latke) यांच्या नोकरीच्या राजीनाम्याचा मुद्दा आड आल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. कोर्टात ठाकरेंच्या बाजूने निकाल लागला तर ऋतुजा लटके (Rituja Latke) यांची उमेदवारी पक्की पण जर त्यांच्या बाजूने निकाल नाही लागला तर काय? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. यासाठी उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून प्लान बी देखील रेडी असल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेनेचे दिवंगत नेते आणि अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर त्या ठिकाणी पोटनिवडणूक लावण्यात आली आहे. शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर हि पहिलीच निवडणूक असणार आहे. त्यामुळे ही पोट निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंच्या (Rituja Latke) नोकरीचा राजीनामा अद्याप मुंबई महापालिकनं अद्याप मंजूर केलेला नाही. त्यामुळं या विरोधात ऋतुजा लटकेंनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी पार पडणार आहे.
ठाकरे गटाकडून प्लॅन बी रेडी
जर ऋतुजा लटकेंचा (Rituja Latke) राजीनामा न स्वीकारल्यास ठाकरे गटानं प्लॅन बी तयार केला आहे. कमलेश राय, प्रमोद सावंत, तसेच दिवंगत रमेश लटके यांच्या मातोश्री यांचे नाव अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवार म्हणून चर्चेत आहे. तसेच ऋतुजा लटकेंच्या याचिकेवरील सुनावणीकडे भाजप नेत्यांचेसुद्धा लक्ष लागून राहिले आहे. कोर्टाच्या निकालानंतर अंधेरी पोटनिवडणुकीतील उमेदवारीबाबत भाजपकडून निर्णय घेण्यात येणार आहे.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय