अंधेरी पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

andheri bypoll

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके याना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. गेल्या महिन्या भरापासून अंधेरी पूर्व पोटनिवडणूक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. … Read more

अंधेरीचा पहिला झटका … मशाल पेटली; सामनातून भाजपवर टीकेचा बाण

thackerays shinde fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने अखेरच्या क्षणी आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेतल्यानंतर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून भाजप आणि शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. अंधेरीचा पहिला झटका …. मशाल पेटली या मथळ्याखाली सामनातून टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत. अंधेरीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ‘मशाली’चा पहिला चटका महाराष्ट्राच्या दुष्मनांना बसला आहे. पुढे पुढे पहा. आणखी … Read more

राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र म्हणजे स्क्रिप्टचा भाग; राऊतांच्या दाव्याने खळबळ

Raut thackeray fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घ्यावी अशा आशयाचे पत्र काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना लिहिले होते. त्यांनतर आज भाजपने आपले उमेदवार मुरजी पटेल यांचा अर्ज मागेही घेतला. यांनतर अनेकांनी भाजपच्या भूमिकेचं स्वागत केलं असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र हा एक स्क्रिप्टचा … Read more

भाजपने अर्ज मागे घेताच राज ठाकरेंनी मानले फडणवीसांचे आभार

raj thackeray fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घ्यावी अशा आशयाचे पत्र काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना लिहिले होते. त्यांनतर आज भाजपने आपले उमेदवार मुरजी पटेल यांचा अर्ज मागे घेतल्यांनंतर राज ठाकरेंनी फडणवीसांचे आभार मानले आहेत. काल मी केलेल्या विनंतीला मान देऊन आपण अंधेरी (पूर्व) च्या पोट-निवडणुकीत भारतीय जनता … Read more

राज ठाकरे मुर्दाबाद!! मुंबईत मुरजी पटेल समर्थकांची घोषणाबाजी

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडुकीतून भाजपने माघार घेतली आहे. भाजपचे आजच्या शेवटच्या दिवशी आपले अधिकृत उमेवार मुरजी पटेल यांचा अर्ज मागे घेण्याची घोषणा केल्यांनतर मुंबई पटेल यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राज ठाकरेंमुळेच भाजपने मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला असा आरोप … Read more

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी भाजपचा मोठा निर्णय

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागून राहिलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ही पोटनिडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी केली होती. अखेर भाजपने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेत उमेदवार मुरजी पटेल यांचा अर्ज मागे घेतला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे … Read more

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शेलार- पटेल ठाम; फडणवीसांची कोंडी?

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक भाजपने लढवू नये अशा विनंतीचे पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले. यांनतर अनेक राजकीय प्रतिक्रियाही उमटल्या. राज ठाकरेंच्या पत्रांचा गांभीर्याने विचार करू असं म्हणत फडणवीसांनी संकेतही दिले मात्र मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि मुरजी पटेल हे मात्र निवडणूक लढवण्यास ठाम असल्याचे … Read more

ठाकरेंसाठी अंधेरी पोटनिवडणुक प्रतिष्ठेची का आहे?? जाणून घ्या ‘ही’ 5 कारणे

Uddhav Thackeray BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर अंधेरी पूर्व मतदासंघाची पोटनिवडणूक लागली आहे. ३ नोव्हेंबरला याठिकाणी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून मुरजी पटेल हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकूण २५ जणांनी उमेदवारी अर्ज भरला असला … Read more

राजसाहेब, खरंच मराठीबद्दल प्रेम असेल ऋतुजा लटकेंना पाठिंबा द्या; कोणी केली मागणी?

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आम्हीच खरी शिवसेना असं सांगणाऱ्या शिंदे गटाने अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची हक्काची जागा भाजपसाठी सोडल्याने त्यांचे मराठी बद्दलचे प्रेम आता जनतेपुढे उघड झालं आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना खरंच महाराष्ट्र आणि मराठी माणसाबद्दल प्रेम असेल तर त्यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना पाठिंबा द्यावा अशी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी … Read more

राज ठाकरे एकनाथ शिंदेंच्या भेटीला; अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपला पाठिंबा??

raj thackeray eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वर्षा या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आरोग्य विषयावर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक पार पडली. यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे उपस्थित होते. यावेळी अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीवर सुद्धा चर्चा झाल्याची शक्यता आहे. … Read more