मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन; मलिकांची रोखठोक भूमिका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी खोट्या कागदपत्राच्या आधारावर नोकरी मिळवली असून ते मुस्लिम आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. तसेच त्यांनी समीर वानखेडे यांच्या जन्मपत्रिकेचा फोटो देखील शेअर केला होता. दरम्यान, मी दिलेले पुरावे खोटे असतील तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन असे आव्हान नवाब मलिक यांनी दिले आहे.

समीर वानखेडेंविरुद्ध सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्यास मी राजीनामा देईल, अन्यथा समीर वानखेडेंनी राजीनामा द्यावा, असं नवाब मलिक यांनी म्हंटल. फसव्या मार्गाने समीर वानखेडे याने IRS ची नोकरी मिळवण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र मिळवले आणि त्यामुळे एका पात्र अनुसूचित जातीच्या व्यक्तीला त्याच्या भविष्यापासून वंचित ठेवले आहे, ते मला समोर आणायचे आहे, असं मलिक यांनी म्हंटल.

मलिकांकडून समीर यांच्या पहिल्या लग्नाचा फोटो शेअर –

तत्पूर्वी, नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा फोटो शेअर केला. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि शबाना कुरेशी यांच्या लग्नाचे सर्टिफिकेट ट्विटर वर शेअर केले आहे. तसेच या लग्नावेळी साक्षीदार म्हणून समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन यांचे पती अजीज खान हे होते असा दावाही त्यांनी केला आहे. यापूर्वी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या जन्माचे प्रमाणपत्र ट्विटर शेअर केलं होतं.

Leave a Comment