NEFT, IMPS आणि UPI अयशस्वी व्यवहारामध्ये कमी झालेले पैसे वेळेत परत मिळाले नाही तर बँक दररोज देणार 100 रुपये; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | 1 एप्रिल रोजी म्हणजेच आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्व खाजगी आणि सरकारी बँक बंद ठेवल्या गेल्या होत्या. बँक बंद असल्यामुळे ऑनलाईन व्यवहार वाढले होते. यावेळी ग्राहकांना ऑनलाईन व्यवहार करण्यात अडचण निर्माण होत होती. अनेक ग्राहकांचे व्यवहार अयशस्वी झाले होते. जर तुमच्याशी सुद्धा असे झाले असेल आणि वेळेत पैसे परत मिळाले नसतील तर बँकेकडून दररोज तुम्हाला 100 रुपये भरपाई मिळणार आहे.

भारतीय रिझर्व बँकेने सप्टेंबर 2019 च्या परिपत्रकात स्पष्ट याबद्दल उल्लेख केला आहे. या परिपत्रकानुसार पैश्यांच्या पारताव्या संदर्भात दिवसांचा स्पष्ट उल्लेख केला आहे. जर दिलेल्या वेळेत कोणताही तोडगा निघाला नाही तर ग्राहकांना भरपायी म्हणून दरदिवशी 100 रुपये देण्याचे आदेश बँकेला दिले आहेत.

जर दिलेल्या वेळेत आपल्या युपीआय व्यवहारावर पैसे परत आले नाहीत तर आपण बँके विरोधात तक्रार दाखल करू शकता. यासाठी ग्राहकाला रेंज डिस्पुटवर जावे लागेल. यामध्ये आपल्याला आपली तक्रार नोंदवता येईल. तक्रार करूनही आपले पैसे आपल्याला परत मिळाले नाही तर आपण आरबीआयच्या लोकपाल योजना डिजिटल व्यवहारांच्या 2012 च्या अंतर्गत तक्रार दाखल करू शकता.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment