कंदहार । अफगाणिस्तानातील 85 टक्के क्षेत्र ताब्यात घेतलेले अफगाण तालिबान दिवसेंदिवस बळकट होत चालले आहेत. तालिबानी सेनेचे सैनिक दररोज अफगाण सैन्याच्या चौक्या ताब्यात घेत आहेत. तालिबानी दहशतवादी जेव्हा पाकिस्तानला लागून असलेली अशीच एक पोस्ट हस्तगत करण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांचे नशिबच उघडले. येथे त्यांना 3 अब्ज पाकिस्तानी रुपये (300 कोटी) मिळाले. पाकिस्तानी मीडिया जिओ न्यूजच्या म्हणण्यानुसार तालिबानचे प्रवक्ते झाबीउल्ला मुजाहिद यांनी निवेदन जारी करून हे मान्य केले आहे. कंदहार जिल्ह्यातील बोल्डक येथे पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा क्रॉसिंग येथे ही घटना घडली. जिओ न्यूजनुसार तालिबानी त्यांच्या दिशेने येत असल्याचे पाहून अफगाण सैनिक चेकपोस्ट सोडून पळून गेले.
ही पोस्ट ताब्यात घेतल्यानंतर तालिबानी सैनिकांनी पहिले अफगाणिस्तानचा झेंडा काढून आपला झेंडा लावला. ही पोस्ट धोरणात्मकदृष्ट्या खूप महत्वाची असल्याचे मानली जाते. येथूनच अफगाणिस्तान आणि पाकिस्तानची सीमा सहजपणे ओलांडली जाऊ शकते. त्याला बोल्डक-चमन-कंधार रोड असे म्हणतात. आता हा भाग पूर्णपणे तालिबानच्या ताब्यात गेला आहे.
तालिबान्यांनी ही चौकी ताब्यात घेतल्याची कबुली पाकिस्तानच्या लष्करानेही दिली आहे. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयानेही या घटनेबाबत निवेदन जारी केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, ते या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. पाकिस्तानी जिओ न्यूजने म्हटले आहे की, दहशतवाद्यांच्या हाती लागलेले पैसे तस्करांकडून घेतले गेले आहेत. या मार्गावर जेव्हा जेव्हा तस्करांना पकडले जात असे तेव्हा तेव्हा अफगाण सैनिक त्याच्याकडून लाच घेत असत.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group