हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयने २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या असून 30 सप्टेंबरपर्यंत नागरिक त्यांच्याकडे असलेल्या नोटा बदलू शकतात. आरबीआयच्या या निर्णयानंतर बँकांमध्ये नोटा बदलण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे तर पेट्रोल पंपावरही लोक २००० च्या नोटा देऊन गाडीत पेट्रोल टाकत आहेत. परंतु तरीही अनेक व्यापारी आणि छोटे दुकानदार २००० रुपयांच्या नोटा घेण्यास टाळाटाळ करत आहेत. अशा स्थितीत सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. परंतु तुम्हाला माहित आहे का? जर कोणी तुमच्याकडून 2000 रुपयांची नोट घेण्यास नकार देत असेल तर तुम्ही त्याच्याविरुद्ध तक्रार करू शकता.
2000 च्या नोटा बदलण्याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे स्पष्ट सांगितले आहे की, जर कोणत्याही बँकेने नोटा घेण्यास नकार दिला तर तुम्ही संबंधित शाखेच्या व्यवस्थापकाकडे याबाबत तक्रार करू शकता. जर तुम्ही बँकेच्या उत्तराने समाधानी नसाल किंवा काही उशीर होत असेल तर तुम्ही रिझर्व्ह बँकेच्या cms.rbi.org-.in या वेबसाइटला भेट देऊन तक्रार करू शकता.
याशिवाय, जर एखादा दुकानदार किंवा नोट स्वीकारण्यास नकार देत असेल, तरीही तुम्ही रिझर्व्ह बँकेची वेबसाइट cms.rbi.org.in वर जाऊन तक्रार करू शकता. त्याचबरोबर बँक मॅनेजरला भेटूनही तुम्ही याबाबत तक्रार करू शकता. कोणतीही व्यक्ती RBI च्या एकात्मिक लोकपाल योजनेअंतर्गत पुराव्यासह दुकानदाराकडे तक्रार करू शकतो. आरबीआय गव्हर्नर यांनी स्पष्ट केले आहे की कोणतीही बँक, संस्था किंवा दुकानदार 30 सप्टेंबरपर्यंत 2000 च्या नोटा घेण्यास नाही म्हणूच शकत नाहीत कारण या नोटा चलनातून बाहेर काढल्या गेल्या नाहीत. कायदेतज्ज्ञांच्या मते, भारतीय दंड संहितेअंतर्गत २००० ची नोट न स्वीकारल्यास कलम 188 आणि कलम 124A (देशद्रोह) अंतर्गत शिक्षा होऊ शकते.