नवी दिल्ली । तुमचे भविष्य निर्वाह निधी संस्थेमध्ये खाते असेल आणि त्यासंबंधी कोणतीही तक्रार असल्यास, ऑनलाइन तक्रार नोंदवून तुम्ही त्यावर योग्य उपाय मिळवू शकता. EPFO ने आपल्या सदस्यांच्या तक्रारींसाठी ऑनलाइन सुविधा सुरू केली आहे. जर एखाद्या EPF खातेधारकाला EPF काढणे, EPF खात्याचे ट्रान्सफर, KYC इत्यादींशी संबंधित कोणतीही तक्रार असेल, तर तो या ग्रीवांस मॅनेजमेंट सिस्टीमद्वारे तक्रार नोंदवू शकतो. याशिवाय, तुम्ही EPFO च्या ट्विटर हँडल @socialepfo वर तक्रार किंवा कोणतीही माहिती टाकू शकता.
तुम्ही EPFO च्या ऑनलाइन पोर्टल epfigms.gov.in वर जाऊन देखील तुमची तक्रार नोंदवू शकता. EPFO ने आपल्या ट्विटर अकाउंटवर तक्रार दाखल करण्यासंबंधीची माहिती शेअर केली आहे. तुम्ही 1800-118-005 या टोल फ्री क्रमांकावर जाऊन तक्रार नोंदवू शकता. तुम्ही EPFO च्या ग्रीवांस मॅनेजमेंट सिस्टीमकडे तक्रार करू शकता.
जर एखाद्या खातेदाराला त्याच्या PF खात्याशी संबंधित काही तक्रार असेल जसे की PF ट्रान्सफर, EPF काढणे, EPF अकाउंट किंवा KYC इत्यादी, तर तुम्ही ऑनलाइन नोंदणी करून त्याचे निराकरण करू शकता.
तक्रार कशी करावी ?
– सर्वप्रथम http://epfigms.gov.in या पोर्टलवर जा.
– तक्रार नोंदवण्यासाठी ‘रजिस्टर ग्रीव्हन्स’ वर क्लिक करा.
– तुमच्या समोर एक नवीन वेबपेज उघडेल. यामध्ये, ज्या स्टेटसमध्ये तक्रार नोंदवली जात आहे ते निवडा.
– स्थिती म्हणजे PF मेंबर, EPS पेन्शनर, इंप्लॉयर किंवा इतर.
– तुमच्याकडे UAN/पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO) नसल्यासच ‘इतर’ पर्याय निवडा.
– PF खात्याशी संबंधित तक्रारीसाठी ‘PF मेंबर’ स्टेट्स निवडा.
– आता UAN आणि सिक्योरिटी कोड टाका आणि ‘Get Details’ वर क्लिक करा.
– UNN शी लिंक लिंक मास्क्ड (लपलेले) पर्सनल डिटेल्स कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर दाखविले जातील.
– आता ‘Get OTP’ वर क्लिक करा.
– EPFO डेटाबेसमधील तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीवर वन टाइम पासवर्ड पाठवला जाईल.
– OTP एंटर केल्यानंतर, सत्यापन होईल आणि नंतर तुम्हाला वैयक्तिक तपशील विचारले जातील.
– पर्सनल डिटेल्स एंटर केल्यानंतर, ज्या PF क्रमांकावर तक्रार नोंदवायची आहे त्यावर क्लिक करा.
– आता स्क्रीनवर एक पॉप-अप दिसेल. यामध्ये तुमची तक्रार ज्या रेडिओ बटणाशी संबंधित आहे ते निवडा.
– ग्रीवांस कॅटेगिरी निवडा आणि तुमच्या तक्रारीचा तपशील द्या.
– तुमच्याकडे काही पुरावे असतील तर ते देखील अपलोड करता येतील.
– तक्रार नोंदवल्यानंतर ‘Add’ वर क्लिक करून सबमिट वर क्लिक करा.
– तुमची तक्रार नोंदवली जाईल.
– तक्रार रजिस्टर्ड नंबर तुमच्या रजिस्टर्ड ईमेल आणि मोबाईल क्रमांकावर येईल.
याप्रमाणे तक्रारीचे स्टेट्स तपासा
EPFO कडे तक्रार नोंदवल्यानंतर तुम्ही त्याचे स्टेट्स देखील जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला http://epfigms.gov.in या पोर्टलवर जावे लागेल. येथे ‘view status’ हा पर्याय निवडा. तक्रार रजिस्टर्ड नंबर आणि मोबाइल क्रमांक/ईमेल आयडी आणि सिक्योरिटी कोड एंटर करा. आता कॉम्प्युटर स्क्रीनवर तक्रारीचे स्टेट्स दिसेल. तुमच्या तक्रारीवरEPFO चे कोणते प्रादेशिक कार्यालय काम करत आहे हे देखील दाखवेल आणि अधिकाऱ्याचे नाव देखील येईल. प्रादेशिक EPFO ऑफिसशी संपर्क साधायचा असल्यास, ईमेल पत्ता आणि फोन नंबर स्क्रीनवर दिसेल.