हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसांपासून लोक घरातच आहे . कोरोनाच्या संकटाच्या काळात घरातून काम करत असल्याने अनेक जणांनी आपले छंद जोपासले, अनेक जुनी पुस्तके वाचलीत, महिलांनी नवीन नवीन रेसिपी शिकल्या आणि घरच्यांना खाऊ पण घातल्या . अनेकांनी आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणीशी गप्पा मारल्या जुन्या आठवणी मध्ये रमून गेले. एकमेकांच्या संपर्कात बऱ्याच वर्षांनी आले पण याच साधन काय तर व्हाट्सअप ग्रुप पण काही वेळेला याच ग्रुप च्या नोटिफिकेशन मुळे लोक त्रस्त होतात. त्यावर उपाय व्हाट्सअप ने काढला आहे.
व्हाट्सअप दरवेळी ग्राहकानं वापरायला सोपे जावे असे नवनवीन फीचर्स आणत असत. जास्त करून व्हाटसप हे अनेक महत्वाच्या गोष्टी शेअर करण्यासाठी वापरलं जात अनेक ग्रुप असल्याने त्या ग्रुप चे नोटिफिकेशन पण जास्त असतात. त्यामुळे व्हाट्सअप ग्राहकांसाठी नवं फीचर्स लवकरच आणणार आहे. कि जे फीचर्स कायम स्वरूपी बंद केलं तर त्याचा युजर्स ना त्रास होणार नाही. wabetainfo असं या फीचर्स च नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार बीटा फॉर अँड्रॉइड व्हर्जन २. २०. १९७. ३असं व्हर्जन च नाव आहे. त्यामध्ये म्यूट हा पर्याय देण्यात आला आहे. त्यानुसार आता कायमस्वरूपी म्यूट हा पर्याय असणार आहे. mute always हा पर्याय असणार आहे.
व्हाट्सअप वर अनेक युजर चे ग्रुप आहेत. त्यामुळे त्यांच्या नोटिफिकेशन ची संख्या पण जास्त असते यापूर्वी देण्यात आलेल्या फीचर्स मध्ये वन इयर साठी म्यूट असा पर्याय देण्यात आला होता. परंतु आता कायम स्वरूपी म्यूट असापर्याय देण्यात येणार आहे. ग्रुप म्यूट केला असला तरी त्याचे मॅसेज वाचता येणार आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.