‘या’ सरकारी बँकेत खाते असेल तर लवकर समजून घ्या त्यांचे नवीन नियम! अन्यथा आपले व्यवहार होतील बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसापासून बँकेचे वेगवेगळे नियम समोर येत आहेत. यामध्ये बँकांच्या खाजगी करनापासून ते आयएफएससी कोड बदलण्यापर्यंतचे निर्णय आहेत. तुम्ही बँक ऑफ बडोदामध्ये खातेदार असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. बँक ऑफ बडोदा एक मार्च 2021 पासून आपले आयएफएससी कोड बदलणार आहे. यासोबत देना बँकही आपले कोड बदलणार आहे. तुम्ही या दोन बँकेपैकी कोणत्याही बँकेचे ग्राहक असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

आयएफएससी कोड ला बँकेच्या व्यवहारांमध्ये खूप महत्त्वाचे मानले जाते. जर हे कोड तुमच्याकडे नसतील तर तुमचे व्यवहार पूर्ण होणार नाहीत. बँक ऑफ बडोदा ही सरकारची देशातील तिसरी सर्वात मोठी बँक आहे. बँकेने आपल्या ट्विटर वरून ही नवीन माहिती दिली. सोबतच, दोन्ही बँकेच्या शाखेमधून नवीन आयएफसी कोड प्राप्त करून घेण्यासाठी सूचनाही केल्या आहेत. यामुळे वेळेत माहिती घेऊन पुढील त्रास वाचवता येऊ शकणार आहे.

जर आयएफएससी कोड सोबत काही समस्या येत असेल तर, तुम्ही 1800 258 1700 या टोल फ्री नंबरवर कॉल करू शकता. शाखेच्या आयएफएससी कोड बद्दल विचारू शकता. सोबतच, तुम्ही 422009988 या क्रमांकावर मेसेज नाही करू शकता. मेसेज करताना तुम्हाला ‘MIGR last 4 digit of the old account number’ असे लिहून आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरून वरील क्रमांकावर एसएमएस पाठवून द्यायचा आहे. यानंतर तुमच्या मोबाईल वरती नवीन आयएफएससी कोड प्राप्त होईल व भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणीपासून तुम्ही वाचू शकता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.