Dengu Symptoms: डेंग्यूच्या ‘या’ प्रमुख लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष, अन्यथा बेतू शकते जीवावर..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पावसाळा सुरू झाला की रोगराई पसरण्यास सुरुवात होते. सध्या राज्यात डेंग्यूची साथ वेगाने पसरत आहे. चिंतेची बाब म्हणजेच, डेंगूच्या साथीमुळे रुग्णांच्या मृत्यू संख्येत देखील वाढ झाली आहे. रुग्णांमध्ये दिसणारी डेंगूची लक्षणे घातक आहेत. यावर ताबडतोक उपाय केला नाही तर रुग्णाचा जीव देखील जाऊ शकतो. त्यामुळे वेळेत डेंग्यू आजाराचा धोका लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे.

डेंगूची लक्षणे कोणती?

डेंगू या आजारात प्रमुख लक्षणे, सतत हलकासा ताप येणे, उलट्या, जुलाब होणे अशी आहेत. परंतु जर सगळ्यात उलट्या जुलाब तापाचे प्रमाण वाढत असेल तर त्वरित रुग्णालयात जाऊन उपचार घेणे आवश्यक आहे. कारण की ही लक्षणे डेंग्यूचा धोकादायक स्ट्रेन असल्याची आहेत. अशावेळी रुग्णाला डेंग्यू शॉक सिंड्रोम होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच पेशी अचानक कमी होणे, शरीरातील अवयव निकामी पडणे, रुग्ण बेशुद्ध पडणे हे सर्व प्रकार देखील रुग्णाच्या जीवावर बेतू शकतात. अशावेळी ताबडतोब रुग्णाला डॉक्टरांच्या उपचारांची गरज असते.

डेंगूची टेस्ट करणे अती आवश्यक

सध्या पावसाचे वातावरण असल्यामुळे वायरल इन्फेक्शन देखील मोठ्या प्रमाणात पसरत आहे. त्यामुळे यात डेंगूची लक्षणे कोणती आणि वायरल इन्फेक्शन कोणते हे समजणे फार कठीण जात आहे. रुग्णाला जास्त त्रास व्हायला लागल्यानंतर या सर्व बाबी लक्षात येतात. त्यामुळे जर डॉक्टरांनी वेळेत कोणत्या टेस्ट करायला सांगितल्या असतील तर त्या त्वरित करून घेणे आवश्यक आहे. डेंगूची टेस्ट केल्यानंतर त्यामध्ये जर रुग्ण पॉझिटिव आढळून आला तर त्यावर योग्य उपाययोजना कराव्यात.

डेंगू आजारापासून बचाव

डेंगू आजारापासून बचाव करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे सर्वात आवश्यक आहे. घराजवळ साचलेल्या पाण्यावर डेंगूचे मच्छर बसू शकतात. त्यामुळे असे पाणी साचवणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. नेहमी आपले शरीर हायड्रेटेड ठेवण्याचा प्रयत्न करावा. नेहमी बाहेर जाताना अंग झाकलेले कपडे वापरावेत. तसेच झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा.