औरंगाबाद : जिल्ह्य़ात कोराना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्या पार्श्वभूमीवर शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे संचारबंदीत विनाकारण अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडा, अन्यथा विनाकारण फिरणाऱ्यांची मुख्य चौकात मोबाईल व्हँनमध्ये कोविड-19 टेस्ट करण्यात येणार आहे. महापालिका प्रशासन व पोलिस विभागाच्या सहाय्याने शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर आता मोबाईल व्हँनची नजर असणार आहे.
संचारबंदीदरम्यान दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत औरंगपुरा चौक, रेल्वेस्टेशन चौक, दिल्लीगेट पोलीस चौकी, टीव्ही सेंटर चौक, आकाशवाणी चौक, महानुभव चौकात विनाकारण फिरणाऱ्यांची कोविड टेस्ट करण्यात येणार आहे. अशी माहिती मनपा प्रशासक अस्तिक कुमार पाण्डेय यांनी ट्विट करुन दिली आहे.
https://www.facebook.com/aurangabadnewslive/videos/459846921895718/
दरम्यान कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये असे आवाहन वारंवार करण्यात येत असून अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे कोणीही नियम मोडू नये असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page