बँक खात्याला नंबर जोडायचा आहे तर ATM च्या माध्यमातूनही ‘असा’ जोडू शकता नवीन नंबर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या बँक खात्याला नंबर जोडलेला असणे आताच्या घडीला फार महत्त्वाच आहे. आता ऑनलाईन ट्रांजेक्शन, जमा किंवा काही रक्कम काढल्यास मोबाईल नंबर वर एसएमएस येत असतो. मोबाइल नंबरवर खात्या संबंधित बारीकसारीक गोष्टीही अपडेट येत असतो. बऱ्याच वेळा आपण नंबर बदलतो त्यामुळे मोठी अडचण निर्माण होते. तसेच अलीकडे खोटे नंबर वापरून अनेक घोटाळे केले जातात. त्यामुळे नंबर बदलला अथवा बंद केला तर बँक खात्याचा नंबरही तात्काळ बदलला गेला पाहिजे.

कोणताही बँक खात्यात जोडलेला नंबर काही कारणास्तव बदलायचा असेल तर आता बँकेत जाण्याची गरज नाही. काही सोप्या स्टेप्स मधूनही तुम्ही नंबर बदलू शकता. नंबर बदलण्यासाठी ऑनलाइन अथवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने तुम्ही तो बदलू शकता. तसेच ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेच्या एटीएम मशीनच्या माध्यमातून देखील देखील नंबर बदलता येऊ शकतो.

https://t.co/95TzJA5NFu?amp=1

एटीएम मशिनच्या मार्फत तुम्हाला तुमच्या खात्याचा मोबाईल नंबर बदलायचा असेल तर, काही सोप्या गोष्टी तुम्हाला करायला लागतील. त्या खालील प्रमाणे,
– ज्या बँकेमध्ये खात आहे त्या बँकेच्या एटीएम मशीन वर तुम्हाला जायला लागेल,
– एटीएम कार्ड मशीन मध्ये इन्सर्ट केल्यानंतर तुम्हाला रजिस्टेशन पर्यायावर क्लिक करायला लागेल.
– एटीएम पिन टाकल्यानंतर तुम्हाला मोबाइल नंबर रजिस्ट्रेश पर्याय येईल त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करा
– नंतर तुमचा मोबाईल क्रमांक टाका आणि करेक्ट हा पर्याय निवडा
– आता तुमच्या मोबाईलवर रेफरन्स नंबर आणि ओटीपी आला असेल तो संबंधित बँकेच्या नंबर वरती एसेमेस करून पाठवा.

https://t.co/dAN1K00Y9z?amp=1
(तुम्ही एसबीआय ग्राहक असाल तर 567676 वरती मेसेज करा करावा लागेल आणि जर तुम्ही इतर बँकेचे ग्राहक असाल तर तो नंबर एटीएम कार्ड वर दिलेला असेल यावर तुम्ही एस एम एस पाठवू शकता) या सर्व प्रोसेस नंतर तुमचा नवीन मोबाईल नंबर रजिस्टर होईल.

https://t.co/PSPa7KtfLj?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.