गोकुळच संचालक व्हायचं मग काढून दाखवा दहा लिटर दूध : राजू शेट्टींचं खुलं चॅलेंज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील मात्तबर नेत्यांची धावपळ सुरु झालीय. कुणी प्रत्यक्ष तर कुणी छुप्या पद्धतीनं आपली रणनिती आखत आहेत. गोकुळच्या निवडणुकीत आकर्षणाच्या ठिकाणी दोनच नेते आहेत. तर गोकुळमधील विरोधक एक एक नेता विरोधी पॅनलमध्ये म्हणजे राजर्षी शाहू विकास आघाडीत घेत आहेत. तर सत्ताधारी प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन आपली सत्ता भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलेली एक मागणी, आत सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.. ती अट अशी पाहिजे की इच्छुकांनी न थकता किमान 10 लीटर दूध काढून दाखवावे.

सध्या गोकुळ दूध संघावर माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या गटाची सत्ता आहे. मात्र, यंदा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी महादेवराव महाडिक यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावायचे ठरवले आहे. त्यासाठी सतेज पाटील विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत.त्यामुळे महादेवराव महाडिक हेदेखील सावध झाले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी सहकार आणि राजकीय क्षेत्रातील मातब्बर व्यक्तींच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. महादेवराव महाडिक यांनी बुधवारी राजू शेट्टी यांचीही भेट घेतली. यावेळी त्यांनी गोकुळ दूध संघ वाचवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सत्ताधारी गटासोबत राहावे, अशी विनंती राजू शेट्टी यांना केली.

गोकुळ दूध संघावर गेली 25 वर्षे एकहाती सत्ता असलेल्या महादेवराव महाडिक यांच्यासमोर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी मोठं आव्हान उभं केलं आहे. गेल्या निवडणुकीच्या वेळी थोडक्यात हुकलेली सत्ता यावेळी कोणत्याही परिस्थितीत मिळवायचीच असा चंगच ना. सतेज पाटील यांनी बांधलाय. त्यामुळे गोकुळच्या या राजकीय कुस्तीत आता रंग भरायला सुरुवात झाली असून त्याचा धुरळा पार मंत्रालयापर्यंत उडाल्याचं दिसतोय.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.

ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

Leave a Comment