हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एका अजब सल्ला दिला. पंकजा मुंडे म्हणाले की, “दारू प्यायची असेल तर हातभट्टीची पिऊ नका. त्याने विष बाधा होते. पिण्याला मी नाही म्हणत नाही” त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पंकजा मुंडे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “तंबाखू आणि पुड्या खाणे बंद करा आणि खाऊन कुठेही थुंकू नका. त्याने कॅन्सर होतो. तसेच चांगलं चांगलं खा मास मच्छी व्हेजिटेरियन खा आणि हेल्दी रहा असा सल्ला देखील भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना दिला. तसेच माझा एच बी 14 आहे मी हेल्दी आहे. मला वेळेवर कोणी जेवायला देत नाही तरीसुद्धा मी हेल्दी आहे”
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे या बीड लोकसभेची जागा लढवतील अशी चर्चा रंगली होती. मात्र आता त्यांनी परळी विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत संकेत देत त्या म्हटले आहेत, परळीच्या जागेचा निर्णय वरिष्ठ घेतील. त्यामुळे आता भाजप परळीतून पंकजा मुंडे यांना उभे करेल का? याबाबत वेगळीच चर्चा रंगली आहे.