अनैतिक संबंधाचा संशय; तिघे थेट घरी घुसले, मारायला गेले एकाला अन् घडलं भलतंच

crime murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
मुंजवडी (ता. फलटण) येथील पवारवस्तीत घराशेजारील महिलेशी अनैतिक संबधाच्या संशयावरून झालेल्या मारहाणीत एका महिलेचा खून झाला. सीताबाई किसन सस्ते (रा. पवारवस्ती, मुंजवडी, ता. फलटण) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबतची तक्रार प्रमिला सोमनाथ सस्ते (रा. पवारवस्ती) यांनी फलटण पोलिस ठाण्यात दिली आहे. दरम्यान, संशयितांपैकी तानाजी घुले यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुंजवडीतील पवारवस्ती (ता. फलटण) येथे रविवारी रात्री दहाच्या सुमारास प्रमिला सोमनाथ सस्ते व त्यांचे पती सोमनाथ किसन सस्ते व सासू सीताबाई किसन सस्ते हे सर्व घरात एकत्र बसले होते. त्याचवेळी सोमनाथ किसन सस्ते यांचे घराशेजारील महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून चिडून जाऊन रमेश तानाजी घुले, तानाजी राजाराम घुले व स्वाती रमेश घुले यांनी घरात घुसून सोमनाथ सस्ते यांना जीवे मारण्यासाठी सुरुवात केली.

घटनेत मारहाण करतेवेळी झालेल्या झटापटीत फिर्यादीच्या सासू, सोमनाथ यांच्या आई सीताबाई किसन सस्ते यांच्या पोटात चाकूने वार केल्याने त्या जखमी झाल्या आणि मग उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यांनतर पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी घटनास्थळी भेट दिली असून याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक गोडसे करत आहेत.