कंगनानं घेतलं नमतं; BMCकडे करणार ‘ही’ विनंती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि मुंबई महापालिका (BMC) यांच्यातील वाद आता काही प्रमाणात शमण्याची चिन्हे आहेत. खारमधील इमारतीतील तीन फ्लॅट्स अवैधरित्या एकत्र केल्याप्रकरणी BMC नं सुरु केलेल्या कारवाई विरोधातील याचिका कंगनानं अखेर मागे घेतली आहे. याशिवाय सदर बांधकाम नियमित करून घेण्याची विनंती कंगना BMC कडे करणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कंगनानं मुंबईतील खार भागात एका इमारतीत तीन फ्लॅट खरेदी केले असून तिनं हे तीन फ्लॅट एकत्र केले आहेत. मात्र, घरात हा बदल करताना इमारतीच्या प्लानमधील मुख्य स्ट्रक्चरमध्ये बदल केल्याचं पालिकचं म्हणणं आहे. यासंबंधी पालिकेनं कंगनाला नोटीस बजावली होती. या नोटिशीविरोधात तिनं हायकोर्टात धाव घेतली होती .याप्रकरणी कंगनानं दाखल BMC विरोधात दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे.

याशिवाय, आपण BMC कडे सदर बांधकाम नियमित करुन घेण्यासाठी अर्ज करणार असल्याची माहिती कंगनानं वकिलामार्फत मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. यावर न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी कंगनाला ही मुभा देत, कंगनाने अर्ज केल्यास पालिकेने त्या तारखेपासून चार आठवड्यांत योग्य तो निर्णय द्यावा आणि निर्णय विरोधात असल्यास पालिकेने त्या अनुषंगाने कार्यवाही दोन आठवड्यांपर्यंत करू नये, असे आदेश हायकोर्टानं दिले आहेत.

मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

 

Leave a Comment