पाटण | तालुक्यातील लाल सोनं म्हणून ओळखली जाणारी लाल माती सध्या वेगळ्या काही कारणांनी चर्चेत आहे. पाटण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात उत्खनन चालू आहे. ज्या ठिकाणी उत्खननाला परवानगी मिळाली आहे त्या ठिकाणी नियमबाह्य उत्खनन करून अक्षरशः जमिनीची चाळण केली जात असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. कोयना नदीच्या दोन्ही बाजूंना उत्खननातून लाखो ब्रास मातीची लूट माती सम्राटाकडून केली जात असल्याची सर्वसामान्यांमध्ये चर्चा आहे. यापार्श्वभुमीवर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी मंत्रीमहोदयांकडून प्रशासनाचा गैरवापर सुरु असल्याचा आरोप केला आहे.
उत्खननपासून हाकेच्या अंतरावर असलेले तलाठी कार्यालय, मंडल कार्यालय गप्प का आहेत असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. यावर वरदहस्त कोणाचा आहे अशा सवाल नागरिक विचारत आहेत. प्रशासनाचं यावर गप्प असलेने कारवाई कोणी करायची असा प्रश्न निर्माण झालेला आहे. सर्वसामान्य नागरिक जेव्हा काही व्यवसाय करतात तेव्हा त्यांच्याकडून थोडी चूक झाली तर त्यांना अव्वाच्या सव्वा दंड लावला जातो. परंतु काही धनदांडग्यांकडे मात्र दुर्लक्ष केले जाते असे म्हणत कदम यांनी अप्रत्यक्षपणे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर टीका केली आहे.
सध्या उंब्रज कराड या परिसरात वीटभट्ट्यांसाठी मातीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. यासाठी कराड उंब्रज परिसरातील माती व्यवसायिक पाटण तालुक्यात माती खरेदी करत आहेत. हा संपूर्ण प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून गेल्या वर्षाचा अवैध उत्खननाचा दंड देखील तहसीलदार प्रांत यांना बाहेर काढायला अजूनही मुहूर्त मिळत नाही.
कराटेजवळ रस्त्यालगत केवळ पाच ते दहा फुटांचे अंतर राहिलेले आहे. उद्या अतिवृष्टी झाली आणि नदीची पाणीपातळी वाढली तर त्याचा किती मोठा धोका संभवतो असे म्हणत कदम यांनी प्रशासनाला कारवाई करण्याबाबत आवाहन केले आहे. अधिकाऱ्यांचे हात लाल मातीत रंगले आहेत का असा सवाल जनतेतून विचारला जात आहे. येत्या काही दिवसात अवैध्य उत्खननाबाबत आंदोलन छेडले जाणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
हे पण वाचा :
Edible Oil : होळीच्या दिवशी मागणीत वाढ होऊनही खाद्यतेलाच्या किंमती घसरल्या
Bank Of Baroda ची जबरदस्त ऑफर! गृहकर्ज झाले स्वस्त, प्रक्रिया शुल्कही माफ
Stock Market मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ 7 शब्दांचा अर्थ जाणून घ्या
7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर !!! होळीनंतर वाढणार इतका पगार
Multibagger Stock : कंप्रेसर बनवणाऱ्या ‘या’ कंपनीने गुंतवणूकदारांना दिला कोट्यवधींचा नफा