अवैध दारूविक्री : तीन दुचाकीसह दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, कराड व वाठारच्या तिघांवर गुन्हा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

राज्य उत्पादन शुल्क कराड विभागाच्या पथकाने दि. 31 मे रोजी कराड व वाठार या हद्दित अवैद्य मद्य वाहतुक करताना तीन दुचाकी वाहनासह अवैद्य देशी दारुची वाहतूक करणाऱ्या तिघांवर मुंबई दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सदर छाप्यामध्ये एकूण देशी दारुचे तीन बॉक्स (27 लि. देशी दारु) जप्त करण्यात आली असुन एकूण रुपये 1 लाख 48 हजार 640 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्याच्या अनुषंगाने जिल्हयातील सर्व अबकारी अनुज्ञप्ती बंद करण्यात आले आहे. त्यामुळे सदर कालावधीमध्ये अवैद्य, मद्य चोरटी वाहतुक व विक्री यावार प्रतिबंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विशेष माहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार विभागीय उप-आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापुर वाय. एम. पवार  यांचे आदेशान्वये व  राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अनिल चासकर सातारा यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कराड विभागाच्या पथकाने (दि. 31 मे) रोजी कराड व वाठार या हद्दित अवैद्य मद्य वाहतुकीवर कारवाई केली.

या कारवाईत तीन दुचाकी वाहनासह अवैद्य देशी दारुची वाहतूक करणाऱ्या तिघांवर मुंबई दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सदर छाप्यामध्ये एकूण देशी दारुचे तीन बॉक्स (27 लि. देशी दारु) जप्त करण्यात आली असुन एकूण रुपये 1 लाख 48 हजार 640 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आर. एस. पाटील उप-निरीक्षक आर. एस. खंडागळे तसेच व्ही. व्ही. बनसोडे यांनी केली. यापुढेही सदर बंदच्या कालावधीमध्ये अशीच कार्यवाही करण्यात येईल, असे विभागाचे निरीक्षक आर. एस. पाटील यांनी सांगितले.