औरंगाबाद | समृध्दी महामार्गाच्या नावाखाली माती, मुरूम आणि खडीची अवैद्य तस्करी सुरू आहे. बुधवारी तहसील कार्यालयाच्या पथकाने पळशी परिसरात मोहीम राबवून दोन हायवा ट्रक जप्त केल्या.
शहरालगतच्या ग्रामीण भागात सध्या विविध रस्त्यांचे कामे सुरू आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात मुरूम व मातीसह खडीची वाहतूक होत आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात मुरूम व मातीसह खडीची वाहतूक होत आहे. समृद्धीचे निमित्त करून काही हायवा चालक अवैधरित्या मुरूम माती व कडेने येत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
बुधवारी औरंगाबाद तहसील कार्यालयाच्या पथकाने पळशी गावाजवळ दोन हायवा जप्त केले. या हायवा चालकाकडे पथकाने रॉयल्टी भरणा केलेल्या पावतीची मागणी केली. ही पावती नसल्याने दोन्ही हायवा ट्रक पथकाने जप्त करून तहसील कार्यालयात आणण्याचे प्रयत्न केले, तेव्हा यातील एका ट्रक चालकाने पथकाला धमकावले.