विश्वास नांगरे पाटील यांना निलंबित करून त्यांचीच चौकशी करा; आंबेडकरांची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी दगडफेक केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. या संपूर्ण घटनेवरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील याना जबाबदार धरले असून त्यांना ताबडतोब निलंबित करा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे. प्रकाश आंबेडकर अकोल्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे या घटनेची दिलेली चौकशी हि काढून घेण्यात यावी. सिल्वर ओकवर हल्ला होणार ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई का केली नाही याची त्यांच्याकडून चौकशी करावी. शरद पवार यांच्यासारख्या एक माजी मुख्यमंत्री, एका पक्षाचे अध्यक्ष आणि सध्याचे खासदार यांच्या घरावर मोर्चा येणार याची माहिती असूनही काही कर्तव्ये केलं नाही म्हणून नांगरे पाटील याना ताबडतोब निलंबित करावे अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना केली

मुख्यमंत्र्यांकडून हि मागणी मान्य झाली नाही तर महाविकास आघाडीमधील अंतर्गत कुरघोडी मुळे महाराष्ट्रातील जनता सुखरूप नाही असा निष्कर्ष निघेल असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटल. त्यामुळे या हल्ल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सुरक्षेची जबाबदारी घ्यावी आणि चौकशीचे आदेश द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली

Leave a Comment