राज्यात वाढणाऱ्या ‘म्युकरमायकोसिस’ बाबत राजेश टोपेंनी केल्या केंद्राकडे ‘या’ महत्वाच्या मागण्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :राज्यात एकीकडे कोरोनाने कहर केला असून एका बाजूला कोरोना आणि दुसऱ्या बाजूला म्युकरमायकोसिस चे जाळे राज्यभरात मध्ये पसरायला सुरुवात झाली आहे. राज्यात सध्या म्युकरमायकोसिसचे 1500 पेक्षा अधिक रुग्ण असल्याची माहिती राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्यासोबत सहा राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या बैठकीत राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री यांची संवाद साधला.

राज्यात वाढत्या म्युकरमायकोसिस संक्रमाना बद्दल बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्राकडे काही मागण्या केल्या आहेत खालील प्रमाणे:
– एम्फोटेरेसिन बी इंजेक्शन चा कोटा वाढवून द्यावा.
– इंजेक्शनचे निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना उत्पादन वाढवण्याचे आदेश देण्यात यावेत.
– या औषधाची किंमत सहा हजारांच्या आसपास आहे एका रुग्णाला वीस-वीस इंजेक्शने द्यावी लागतात याची किंमत कमी करावी.
– या आजाराबाबत जनजागृती ची गरज आहे.

राज्यात तीन कोटी चाचण्या

असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले पुढे बोलताना ते म्हणाले, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे सध्या ग्राफ कमी आहे. सध्या काही जिल्ह्यामध्ये मध्ये करोना रुग्ण कमी होत आहेत. मात्र पश्‍चिम महाराष्ट्रात रुग्ण वाढत आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा, मराठवाडा, बीड येथील रुग्ण वाढत आहे त्यामुळे आपल्याला सातत्याने काळजी घ्यावी लागणार आहेत असं ते म्हणाले . चाचण्या कमी होत असल्याचा आरोप राज्यावर आहे मात्र आज झालेल्या बैठकीमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री महाराष्ट्राची परिस्थिती सुधारत आहे ही चांगली बाब आहे महाराष्ट्राचा चांगले काम करत आहे असे म्हणले. बारा कोटी लोकसंख्या असलेल्या राज्यात आतापर्यंत तीन कोटी चाचण्या झाले आहेत.