हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काल टास्क फोर्सची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक पार पडल्यानंतर आताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची बैठक सुरु झाली आहे. यात प्रत्येक जिल्ह्यात लिक्वेड ऑक्सिजन प्लॅन्ट उभारणी करावी, विद्युत शवदाहिनी उभारून ती कार्यान्वित करावी, रेमडेसिव्हीर इंजेक्शन कलेक्टरच्या नियंत्रणाखाली खासगी हॉस्पिटलला देण्यात यावेत तसेच कोरोना आदी महत्वाच्या विषयावर चर्चा केली जात आहे.
या बैठकीला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असून त्यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होत आहे. काल टास्क फोर्सची बैठक झाली होती, त्यानंतर आज पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ही बैठक बोलावली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी टास्क फोर्सची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक पार पडली. कोरोनाबाबतचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. लसीकरण आणि लॉकडॉऊनवर चर्चा करण्यात आली. जवळपास दोन तासांपासून ही बैठक सुरु होती. बैठकीत लॉकडाऊनबाबत चर्चा झाली. तसेच यात ऑक्सिजनची उपलब्धता, रेमिडेसेवीरचा वापर, बेड्सची उपलब्धता, उपचार पद्धती, सुविधा वाढवणे, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कार्यवाही करणे या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन हवा, असं मत टास्क फोर्सच्या बैठकीत मांडलं. पण टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी निदान 14 दिवसांचा लॉकडाऊन लागू झाला तर परिस्थिती नियंत्रणात येईल, असं मत मांडलं. त्यावर लॉकडाऊन लागण्याआधी जनतेला 1 ते 2 दिवसांचा वेळ मिळण्याची शक्यता आहे.