नवी दिल्ली | केंद्र सरकार आज देशातील सहा कोटी नोकरशाही लोकांसाठी मोठा निर्णय घेऊ शकते. पीएफवर मिळणाऱ्या व्याजदराची आज घोषणा होऊ शकते. खूप काळापासून शासकीय कर्मचारी या निर्णयाची वाट पाहत आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांना आज माहिती पडू शकेल की, व्याजदरांमध्ये कतोटी होईल की वाढ होईल. एपीएफओ (APFO) चे सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टिज (सीबीटी) ची बैठक आज म्हणजे चार मार्च 2021 ला श्रीनगरमध्ये होणार आहे. ज्यामध्ये वित्त वर्ष 2020- 21 साठी मिळणाऱ्या प्रॉव्हिडंट फंडवर इंटरेस्ट रेटची घोषणा होऊ शकते. असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पीएफवरील व्याजदराच्या शक्यते बाबत आर्थिक वर्तुळामध्ये बर्याच काळापासून चर्चा सुरू आहे. सन 2020-21 साठी असे मानले जाते की, मिळणाऱ्या व्याजदरांमध्ये सरकार कटोती करू शकते. सन 2019- 20 साठी मिळणारा व्याजदर हा 8.5% होता. यावर्षी असलेल्या कोरोना महामारीमुळे व्याजदरांमध्ये कपात होण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष 2019-20 साठी मिळणारा व्याजदर हा सन 2012-13 नंतर मिळणाऱ्या व्याजदराच्या पेक्षा सर्वात कमी आहे. सन 2018-19 मध्ये 8.5% व्याजदराने व्याज दिले गेले होते.
कर्मचारी भविष्य निधी संघटना एक वित्तीय वर्षासाठी पीएफ राशीवर व्याजदराची घोषणा करते. सन 2019-20 साठी व्याजदरांमध्ये घोषणा करताना संगठनेने म्हटले होते की, 31 मार्च रोजी वित्त वर्ष समाप्तीला 8.5% व्याजदराने व्याजाचे भुगतान करेल. हे भुगतान दोन टप्प्यांमध्ये केले जाईल. पहिल्या व्याजाच्या टप्प्यामध्ये 8.15 टक्के व्याजदराने तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 0.35 टक्के व्याजदराने व्याजाची रक्कम जमा केली जाईल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.