नवी दिल्ली । आज आम्ही तुम्हाला SBI, फास्टॅग आणि फ्री नेटफ्लिक्सशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत. सर्वसामान्यांसाठी ही कामाची बातमी आहे. देशातील या सरकारी बँकेने ग्राहकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. यासह, 1 जानेवारी 2021 पासून फास्टॅगचे नियम बदलणार आहेत. चला तर मग या महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घेउयात –
स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) देशातील वाढते बँकिंग फ्रॉड टाळण्यासाठी ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. एसबीआयने आपल्या ग्राहकांना सतर्क करताना म्हटले आहे की, आमच्या ग्राहकांना फेक ईमेल पाठवले जात आहेत. एसबीआय या ईमेलशी संबंधित नाही. असे कोणतेही ईमेल उघडू नका.
SBI ने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, बँक ग्राहकांना सोशल मीडियावर सतर्क राहण्याची विनंती करते आहे आणि कोणत्याही दिशाभूल आणि बनावट मेसेजेसना भुलू नये. ऑनलाईन बँकिंग सेवेसाठी ऑनलाईन ऑफिशियल पोर्टल onlinesbi.com च वापरा असे बँकेने म्हटले आहे.
OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने आपली सर्व्हिस भारतात दोन दिवस फ्री मध्ये देण्याची घोषणा केली आहे. ही फ्री सर्व्हिस 5 डिसेंबर ते 6 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजता 1 ते 12 या वेळेसाठी असेल. Netflix StreamFest अंतर्गत ही फ्री सर्व्हिस देण्यात येत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
यावेळी, सर्व युझर्स नेटफ्लिक्सच्या सर्व फीचर्स मध्ये प्रवेश करण्यात सक्षम असतील जे सध्या प्रीमियम युझर्सनाच दिले जात आहेत. या सेवेचा लाभ घेण्यासाठी युझर्सना त्यांच्या ईमेल-आयडी किंवा मोबाइल क्रमांकाद्वारे साइन इन / साइन अप करावे लागेल. साइन अप करण्यासाठी डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड डिटेल्स देणे आवश्यक नाही.
1 जानेवारी 2021 पासून देशातील चारही चाकी वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य असेल. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये 1 डिसेंबर 2017 पूर्वी विक्री केलेल्या एम आणि एन वर्ग मोटर वाहनांसाठी (चारचाकी वाहने) फास्टॅग आवश्यक केले गेले आहेत.
नवीन थर्ड पार्टी विमा घेताना वैध फास्टॅग असणे अनिवार्य करण्यासाठी फॉर्म -51 (विमा प्रमाणपत्र) मध्ये बदल करण्यात आला आहे. हा नवीन नियम 1 एप्रिल 2021 पासून अंमलात येईल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.