सातारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीची मतमोजणीची बाबतची महत्वाची बातमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार असून यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. उद्या सकाळी तुमच्या ग्रामपंचायतीची मतमोजणी कुठे व किती कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत होणार यांची माहिती प्रशासनाने दिली आहे.

तालुकानिहाय मतमोजणीचे ठिकाण, अधिकारी व कर्मचारी यांची माहिती पुढीलप्रमाणे.
तालुका कोरेगाव मतमोजणी – इनडोअर स्पोर्टस स्टेडियम हॉल डि पी भोसले कॉलेज कोरेगाव, टेबल-26, RO-26, ARO-63, शिपाई -26, इतर कर्मचारी -55
तालुका माण मतमोजणी – नवीन शासकीय धान्य गोदाम, दहिवडी, टेबल-9 व 1 राखीव, RO- 18 ARO- 18, शिपाई व कोतवाल – 15, पर्यवेक्षक, सहायक व इतर कर्मचारी – 25. खटाव तालुका मतमोजणी – तहसील कार्यालय खटाव, टेबल-9, RO-9, ARO-17, पर्यवेक्षक-9, सहाय्यक-18, शिपाई -3, कोतवाल कर्मचारी -14 इतर-15
तालुका जावली मतमोजणी-तहसिल कार्यालय जावली टेबल- 8, RO- 8, ARO- 16 शिपाई व कोतवाल – 8.  महाबळेश्वर तालुका मतमोजणी –तहसील कार्यालय, महाबळेश्वर, टेबल-3, RO-3, ARO-3, पर्यवेक्षक-3, सहाय्यक-6, शिपाई -3, कोतवाल कर्मचारी -2 इतर-7. खंडाळा तालुका मतमोजणी – नवीन शासकीय इमारत खंडाळा, टेबल-7 व 1 राखीव, RO- 2, ARO- 2, शिपाई व कोतवाल – 10, पर्यवेक्षक, सहायक व इतर कर्मचारी – 21.

वाई तालुका मतमोजणी – तहसील कार्यालय वाई, टेबल-6, RO-5 , ARO-7, पर्यवेक्षक-6, सहाय्यक-6, शिपाई -6 कोतवाल कर्मचारी -6 इतर-16
फलटण तालुका मतमोजणी – नवीन शासकीय धान्य गोदाम फलटण, टेबल-14, RO- 20, ARO- 20, शिपाई व कोतवाल – 22, पर्यवेक्षक, सहायक – 14 व राखीव -2 इतर अधिकारी व कर्मचारी -25. सातारा तालुका मतमोजणी – शाहू स्टेडियम सातारा टेबल-12, RO-19, ARO-37, शिपाई – 26 इतर कर्मचारी -24. कराड तालुका मतमोजणी – नवीन प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय कराड, टेबल-20, RO- 26, ARO- 33, शिपाई व कोतवाल – 40, पर्यवेक्षक, सहायक – 28 इतर अधिकारी व कर्मचारी -20. पाटण तालुक्याची मतमोजणी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मुलांचे वसतिगृह नवीन इमारत पाटण, टेबल-25, RO- 43, ARO- 43, शिपाई व कोतवाल – 40, पर्यवेक्षक 25 , सहायक – 25, कोतवाल 30, संगणक कक्ष कर्मचारी 15, इतर कर्मचारी -25