औरंगाबाद प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे ४ वेळा खासदार राहिलेल्या चंद्रकांत खैरे यांचा वंचित विकास आघाडीच्या इम्तियाज जलील यांनी पराभव केला. या पराभवाला अधोरेखित करताना उद्धव ठाकरे यांनी खैरेंना तुमचा पराभव हा माझा पराभव आहे असे म्हणले होते. त्यावर खासदार इम्तियाज जलील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे.
भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या ‘या’ मतदारसंघात होत आहे नव्या उमेदवाराची मागणी
उद्धव ठाकरे यांनी आता पराभवाची सवय करून घेतली पाहिजे कारण त्यांना येत्या विधानसभा निवडणुकीला मोठा पराभव बघावा लागणार आहे असे इम्तियाज जलील म्हणाले आहेत. खैरे तुमचा पराभव हा माझा पराभव आहे. मी औरंगाबादला असे उघड्यवर पडू देणार नाही. पुढील निवडणुकीत विजय तुमचाच आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
तासगाव विधानसभेला ‘या’ नेत्याला निवडून देण्याचे खा. संजय पाटील यांनी केले आवाहन
दरम्यान, उद्धव ठाकरे रविवारी जालना येथे दुष्काळी दौऱ्यावर आले होते. शिवसेनेतर्फे महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त गावातील चारा छावण्यात दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे महाप्रसादाचं वाटप करण्यात आले. उद्धव यावेळी म्हणाले की, ‘तुम्ही मला मतं दिली. पण मी माझ्या जबाबदारीतून मुक्त होत नाही. म्हणून लोकसभा निकालानंतरही मी तुमच्यासमोर आलो आहे. शेतकऱ्यांना मदत केली नाही तर मी पक्षप्रमुख म्हणून नालायक आहे. मराठवाड्यातील धरणे एकमेकांना जोडणार ही योजना खूप चांगली. जनतेच्या आशीर्वादाशी कधी गद्दारी करणार नाही.’
पवारांनी RSS चे कौतुक केल्याच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे म्हणतात….