काँग्रेस-राष्ट्रवादीला पर्याय म्हणून आम्ही तयार; उद्धव ठाकरेंना योग्य वेळी उत्तर देईन – इम्तियाज जलील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

एमआयएम पक्ष हा काँग्रेस-राष्ट्रवादीला राज्यात समर्थ पर्याय सिद्ध होत असल्याच खासदार इम्तीयाज जलील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितल. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील एमआयएमचे उमेदवार अल्ताफ शिकलगार यांच्या प्रचार सभेला आलेल्या खासदार इम्तीयाज जलील यांना औरगांबाद मध्ये उध्दव ठाकरेंनी केलेल्या टिकेबाबत विचारले असता “उध्दव ठाकरेंनी औरगांबाद मध्ये टीका केली असून, मीही उध्दव ठाकरेंना औरगांबाद मध्ये जाऊनच उत्तर देणार असल्याचं जलील म्हणाले.

वंचित बहुजन आघाडीने आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जंग पछाडले असून राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी ओवेसी आणि जलील यांच्या दरदिवशी ४ सभा होत आहेत. लोकसभा निवडणुकीत पक्षाला ज्या प्रमाणात यश मिळालं होतं त्यापेक्षा चांगलं यश आता मिळेल असा विश्वासही जलील यांनी यावेळी व्यक्त केला.