पिस्तूल दाखवून कोणीही दहशत पसरवत नाही मात्र, जलील यांच्याच घराखाली फायरिंग होते; खैरेंचा पलटवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद । औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विटरवर टाकलेल्या व्हिडीओवरुन राज्यात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओत एका गाडीतून चाललेल्या व्यक्ती हवेत पिस्तूल दाखवत आहे. या व्यक्ती शिवसैनिक असल्याचा जलील यांनी आरोप केलं आहे. यानंतर औरंगाबादचे माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली. हवेत फिरवलेली पिस्तूल ही गाडीत बसलेल्या व्हीआयपी व्यक्तीची असेल असे खैरे म्हणाले. तसेच, बंदूक कोणी कोणाला दाखवली नाही. ते सगळं चुकीचं आहे, असे खैरे म्हणाले.

तसेच, जलील यांच्या घराच्या बाजूलाच गोळ्या झाडल्या जातात असेही खैरे म्हणाले. “दोन दिवसांपूर्वी जलील यांच्या घराच्या बाजूलाच बंदूक चालली. एका भंगारवाल्याने ही बंदूक चालवली. उद्वव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून आमच्याकडे कोणीही दादागिरी करत नाही. बंडखोऱ्या, दगडफेक असले प्रकार आमच्याकडे होत नाहीत,” असे खैरै म्हणाले.

“सध्या राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं सरकार आहे. आम्ही शिवसैनिक आहोत. हवेत फिरवलेला पिस्तूल हा गाडीत बसलेल्या व्हीआयपी लोकांचा असेल,पिस्तूल दाखवून कोणीही दहशत पसरवत नाही. आम्हाला राग येतो पण आम्ही शांत बसतो. हा माणूस चुकून निवडून आला. आता सगळे लोक पश्चात्ताप करतात. जलील दादागिरी करण्याचा प्रयत्न करतात,” असेही खैरे म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

Leave a Comment