Economic Survey 2021: गेल्या दोन वर्षात शालेय विद्यार्थ्यांच्या स्मार्टफोन वापरात झाली 25.3% वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोना साथीच्या आजार आणि 4G मुळे ऑनलाईन शिक्षणाला चालना मिळाली आहे. गेल्या 2 वर्षात शालेय विद्यार्थ्यांचा स्मार्टफोनचा वापर 25.3% वाढला आहे. त्यामुळे आता ई-शिक्षणाचा वापर वाढविण्याच्या धोरणावर सरकार काम करत आहे. याचा योग्य वापर करून शैक्षणिक असमानतेवर मात केली जाऊ शकेल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पातून संसदेच्या पटलावर मांडलेल्या आर्थिक सर्वेक्षण 2021 मध्ये याविषयी सांगितले आहे.

सन 2018 मध्ये अ‍ॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट (ASER) 2020 वेव-1 (रूरल) मध्ये उद्धृत केलेल्या आर्थिक आढाव्यामध्ये, सरकारी आणि खासगी शाळांमधील 36.5% विद्यार्थ्यांनी स्मार्टफोनचा वापर केला. सन 2020 मध्ये ही संख्या वाढून 61.8% झाली आहे. या सर्वेक्षणात असेही म्हटले गेले आहे की, कोरोना साथीच्या काळात सरकारने मुलांच्या शिक्षणापर्यंत पोहोचण्यासाठी PM eVIDYA सारखे प्रयत्न केले आहेत. ‘सेल्फ मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स’ (MOOC) अंतर्गत 92 अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. ज्यामध्ये दीड कोटी विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे. या सर्वेक्षणात म्हटले गेले आहे की, शाळा आणि संस्थांमध्ये दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सरकारने नवीन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 जाहीर केली आहे. यामध्ये परवडणार्‍या आणि स्पर्धात्मक शिक्षणावर भर देण्यात आलेला आहे.

ऑनलाईन टीचर ट्रेनिंगसाठी 267.86 कोटी रुपये देण्यात आले आहेत
कोरोनाव्हायरस साथीच्या काळात मुलांना शिक्षणाचा प्रवेश सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य / केंद्रशासित प्रदेशांना 818.17 कोटी रुपये दिले आहेत. या व्यतिरिक्त, संयुक्त शिक्षण योजनेंतर्गत ऑनलाइन टीचर ट्रेनिंगसाठी 267.86 कोटी रूपये देण्यात आले आहेत. ही रक्कम डिजिटल प्रयत्नांद्वारे ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी वापरली गेली आहे.

प्राथमिक शाळा स्तरावर साक्षरतेचे प्रमाण सुमारे 96% साध्य झाले
सर्वेक्षणानुसार, प्राथमिक शाळा स्तरावर भारतामध्ये साक्षरतेचे प्रमाण 96% आहे. नॅशनल सॅम्पल सर्व्हे (NSS) च्या मते, अखिल भारतीय स्तरावर 7 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांचे साक्षरता दर 77.7% आहे. आर्थिक सर्वेक्षणानुसार, जागतिक स्तरावर येत्या दशकात लोकसंख्येतील तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. त्यांना उच्च प्रतीची शैक्षणिक संधी उपलब्ध करुन देण्याची क्षमता देशाचे भविष्य निश्चित करते. तथापि, चिंता ही आहे की, महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment