ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी गुरु राहुल द्रविडने दिला होता ‘हा’ खास मंत्र; अजिंक्य रहाणेने सांगितलं गुपित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने दमदार प्रदर्शन करत यजमान कांगारून धूळ चारली. अजिंक्य रहाणेच्या कल्पक नेतृत्त्वाचे कौतुक अनेक दिग्गजांनी केले. दरम्यान अजिंक्य रहाणेने माजी भारतीय खेळाडू आणि दिग्गज फलंदाज राहुल द्रविड ने दिलेला तो मोलाचा संदेश सांगितला. रहाणे समालोचक हर्षा भोगलेच्या एका विशेष कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळेस रहाणे बोलत होता.

आयपीएलच्या 13 व्या  मोसमानंतर आम्ही दुबईहून थेट ऑस्ट्रेलियाच्या दिशेने निघत होतो. तेव्हा राहुल द्रविडने  मला कॉल केला होता. ताण घेण्याची गरज नाही, पहिल्या कसोटीनंतर तुलाच टीम इंडियाचे नेतृत्व करायचं आहे. तु फार चांगली फलंदाजी करतोय. फक्त फार वेळ नेट्स मध्ये सराव करु नकोस. जी चूक मी केली, त्या चुकीची पुनरावृत्ती तु करु नकोस. बाकी कोणत्याही गोष्टीचा दबाव घेऊ नको. चांगल्या प्रकारे टीम इंडियाचे नेतृत्व कर. खेळाडूंना विश्वासात घे. मालिकेच्या निकालाबाबत फार विचार करु नकोस. निकाल आपोआप येईल असा सल्ला राहुल द्रविड यांनी दिल्याचे अजिंक्य म्हणाला.

ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या कसोटीनंतर विराट कोहली पाल्कत्वाच्या रजेमुळे भारतात परतला. यामुळे कसोटी मालिकेतील नेतृत्वाची जबाबदारी रहाणेला मिळाली. पहिल्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून निराशाजनक पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे 4 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 0-1 पिछाडीवर पडली होती. तसेच मुख्य खेळाडू हे दुखापतग्रस्त झाले होते. यानंतर रहाणेने आपल्या नेतृत्वात नवख्या खेळाडूंना सोबत घेत जोरदार पुनरागमन करत दुसरा सामना जिंकला. यासह मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. तिसरा सामना बरोबरीत राखण्यास दोन्ही संघांना यश आले. तर चौथ्या आणि शेवटच्या रोमांचक झालेल्या सामन्यात टीम इंडियाने कांगारुंचा 3 विकेट्सने पराभव केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment