नवी दिल्ली । सामान्यतः सोन्यामधील गुंतवणूक जास्त चांगली मानली जाते. लोकं म्युच्युअल फंडामध्ये जोखीम घेऊन जास्त रिटर्न मिळवण्यासाठी गुंतवणूक करतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का की, येणाऱ्या काळात चांदी म्युच्युअल फंड आणि सोन्यापेक्षा कितीतरी पट जास्त रिटर्न देऊ शकते. यावेळी तुम्ही चांदीमध्ये गुंतवणूक केली तर ते तुम्हाला येणाऱ्या काळात भरपूर कमाई मिळवून देऊ शकते.
बाजार विश्लेषकांचा असा विश्वास आहे की, या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत कोरोना महामारी संपल्यानंतर अनिश्चितता कमी होईल, त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक कमी होऊ शकते. त्यानंतर तेजी पाहून लोकं चांदीकडे आकर्षित होतील.
चांदी 80,000 पर्यंत पोहोचेल
पुढील 12-15 महिन्यांत चांदीचा भाव 80,000 रुपयांपर्यंत जाण्याची MOFSL ला अपेक्षा आहे. सिल्व्हर इन्स्टिट्यूटच्या मते, 2022 मध्ये जागतिक चांदीची मागणी 1.112 अब्ज औंसच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचण्याचा अंदाज आहे. 2022 मध्ये फिजिकल चांदीच्या गुंतवणुकीची मागणी 13% वाढण्याचा अंदाज आहे, जो गेल्या 7 वर्षांचा उच्चांक आहे. यासह 2022 मध्ये दागिने आणि चांदीच्या वस्तूंमध्ये चांदीचा वापर अनुक्रमे 11% आणि 21% पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.
चांदी 1.50 लाखांपर्यंत पोहोचेल, 250 टक्के रिटर्न देऊ शकेल
2022 आणि पुढील काही वर्षे चांदी तेजीत राहण्याची अपेक्षा आहे, असे विश्लेषकांचे मत आहे. केडिया ए डव्हायझरीचे व्यवस्थापकीय संचालक अजय केडिया सांगतात की, यावर्षी चांदी 80,000 रुपयांपर्यंत पोहोचेल. यानंतर, 2024 पर्यंत, ते 1.50 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते. चांदी सध्या 61,000 च्या आसपास आहे. या अर्थाने, ते 2024 पर्यंत 33 टक्के आणि 250 टक्क्यांपर्यंत रिटर्न देऊ शकते.
‘हा’ गुंतवणुकीचा पर्याय आहे
आता जास्त लोकं म्युच्युअल फंड आणि एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) मध्ये गुंतवणूक करत आहेत. यामुळेच ETF ची व्याप्ती वाढत आहे आणि आता लोकं सिल्व्हर ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्याकडे वळत आहेत. सेबीने अलीकडेच सिल्व्हर ईटीएफ मंजूर केले आहेत. या वर्षी आतापर्यंत दोन सिल्व्हर ईटीएफ बाजारात दाखल झाले आहेत.
ETF म्हणजे काय ?
ETF म्हणजे सिक्युरिटीज आणि शेअर्स सारख्या मालमत्तेची बकेट. त्याची खरेदी आणि विक्री एक्सचेंजवर होते. त्यामुळे त्यांची वैशिष्ट्ये आणि फायदे स्टॉकमधील गुंतवणुकीसारखेच असले तरी ते म्युच्युअल फंड आणि बाँड्स सारख्या साधनांवर फायदे देखील देतात. कोणत्याही एका कंपनीच्या स्टॉकप्रमाणे, ETF चे ट्रेडिंग देखील दिवसभर चालते. एक्सचेंजवरील मागणी आणि पुरवठा यानुसार त्यांच्या किमतीत चढ-उतार होत राहतात.