2 महिन्यात राणेंचं मंत्रिपद जाणार; कोकणातील नेत्याचा दावा, कारणही सांगितलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मंत्रिपद दोन महिन्यात जाणार आहे, भाजपला त्यांची गरज संपलेली आहे असा दावा कोकणातील ठाकरे गटाचे आमदार गणेश नाईक यांनी केला आहे. यापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही राणेंचं मंत्रिपद जाणार अशी भविष्यवाणी केली होती. आता वैभव नाईक यांनी हा दावा केल्यामुळे भाजप आणि राणे कुटुंबीय यावर काय उत्तर देणार हे पाहायला हवं.

प्रसारमाध्यमांशी बोलताना वैभव नाईक म्हणाले, आतापर्यंत इतरांचं राजकीय अस्तित्व ठरविणाऱ्या राणेंच राजकीय अस्तित्व आता भाजप ठरविणार आहे. महिनाभरा पूर्वी रवींद्र चव्हाण यांचा मेळावा म्हणजे राणेंना वगळून भाजपची वाढलेली ताकद त्यांना दाखवायची होती. भाजपला राणेंची राजकीय दृष्टया गरज संपलेली आहे त्यामुळे येत्या २ महिन्यात राणेंचं मंत्रिपद जाणार आहे, त्यांना राजीनामा द्यावा लागणार आहे, असं वैभव नाईक यांनी म्हंटल .

यावेळी वैभव नाईक यांनी राणेंचे सुपुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर सुद्धा टीका केली. नितेश राणे यांनी आधी आपल्या वडिलांना विचारावे की त्यांना इडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी पक्ष का बदलला? त्यांना आलेल्या ईडीच्या नोटीसचे काय झाले. वडिलांनी नेमका कोणता समझोता केला ? हे आधी जनतेसमोर आणावे आणि मग इतरांना उपदेश करावा असं त्यांनी म्हंटल.