गाडी लावण्यावरून झालेल्या वादातून कॉलेज पार्किंगमध्ये सपासप वार करून खून

0
41
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव प्रतिनिधी |जळगाव मधील मू. जे.महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये दुचाकी पार्क करण्यावरून झालेल्या हाणामारीत चॉपरने सपासप वार करून खून झाला आहे. किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात होऊन हा प्रकार घडला आहे.

असोदा येथील मुकेश सपकाळे हा विद्यार्थी तृतीय वर्षाला पदवीचे शिक्षण घेत होता. शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास मुकेश मू.जे.महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये दुचाकी पार्क करीत असताना त्याचा काही तरुणांसोबत वाद झाला. वाद वाढल्याने तरुणांनी त्याला जबर मारहाण करीत त्याच्यावर चॉपरने वार केले. जखमी विद्यार्थ्याला इतर विद्यार्थ्यांनी रिक्षाचालकांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात आणले. तिथून त्याला खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

या घटनेने जळगाव शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी संबधित विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केलाआहे. आता या घटनेचा पोलीस कसून तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here