कोरोनामध्येही ‘ही’ कंपनी वाढवत आहे 25 टक्के पगार, कामही फक्त 5 दिवसच करावे लागणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोनाव्हायरसमुळे संपूर्ण देशात पुन्हा एकदा लॉकडाउनची परिस्थिती निर्माण झाली आहे. अर्थव्यवस्था पुन्हा संकटात सापडली आहे. यानंतरही भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC, एलआयसी) आपल्या 1.14 लाख कर्मचार्‍यांना एक मोठी भेट दिली आहे. LIC च्या युनियन लीडरनुसार LIC कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. केंद्र सरकारने कर्मचार्‍यांच्या या सुधारित वेतनाची गुरुवारी घोषणा केली. ही वाढ 1 जानेवारी 2017 पासून लागू होईल. All India Insurance Employees Association (AIIEA) सरचिटणीस श्रीकांत मिश्रा म्हणाले की,”या कठीण काळात कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ झाल्याने त्यांना खूप आनंद झाला आहे. या पगाराच्या वाढीमुळे कंपनीतील कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये सुमारे 25 टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा आहे.”

LIC मुळे 2700 कोटींचा भार वाढणार आहे
या वाढीमुळे LIC च्या एकूण पगाराच्या बिलात 2,700 कोटी रुपयांचा बोझा वाढेल. ते पुढे म्हणाले की,”LIC च्या कर्मचार्‍यांना आठवड्यातून फक्त 5 दिवस काम करावे लागेल. महत्त्वाचे म्हणजे एलआयसी आयपीओ सुरू करण्याच्या विचारात आहे, जो आतापर्यंतचा भारताचा सर्वात मोठा आयपीओ असेल. एलआयसी ही भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात जुनी विमा कंपनी आहे. ज्यांचा बाजारात हिस्सा 72 टक्के आहे. विमा उद्योगाच्या पहिल्या वर्षाच्या एकूण प्रीमियम कलेक्शनमध्ये एलआयसीचा हिस्सा 66.2 टक्के आहे. एलआयसीचे अंदाजित मूल्यांकन 9 ते 10 लाख कोटी दरम्यान आहे.”

एलआयसीच्या इतिहासात पहिल्यांदाच इतका उशीर झाला
एलआयसी कर्मचार्‍यांच्या वेज रिविजन थकबाको 1 ऑगस्ट 2017 पासून होणार आहे आणि ते सहसा पाच वर्षे चालते. युनियनच्या एका नेत्याने सांगितले की, “एलआयसीच्या इतिहासात पहिल्यांदाच एका वेज रिविजनला उशीर झाला आहे.”

आयपीओचा किमान दहा टक्के हिस्सा पॉलिसीधारकांसाठी राखीव असेल
एलआयसीच्या आयपीओद्वारे केंद्र सरकार कंपनीतील आपला 10 टक्के हिस्सा विकू शकतो. अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी गेल्या महिन्यातच सांगितले होते की,”एलआयसीच्या आयपीओचा किमान दहा टक्के हिस्सा हा पॉलिसीधारकांसाठी राखीव असेल.” ठाकूर म्हणाले होते की,” सरकार कंपनीचा मोठा भागधारक राहील. त्याचबरोबर व्यवस्थापनावरही त्याचे नियंत्रण असेल जेणेकरून पॉलिसीधारकांचे हित संरक्षित होईल.” सरकारने एलआयसीचे अधिकृत भांडवल वाढवून 25,000 रुपये करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, ज्यामुळे कंपनीच्या लिस्टिंगला मदत होईल. सध्या 29 कोटी पॉलिसी असलेल्या या जीवन विमा कंपनीचे पेड-अप भांडवल 100 कोटी रुपये आहे. एलआयसीची सुरूवात 1956 मध्ये 5 कोटींच्या सुरुवातीच्या भांडवलाने झाली होती.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment