हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणखी कठोर पाऊल उचललं आहे. राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्याचसोबत जिल्ह्याच्या सीमा सुद्धा बंद करण्यात आल्या आहेत. संचारबंदीदरम्यान रस्त्यावर ५ पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दरम्यान संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केल्यानंतर काहींना वाटतं असेल सर्वच बंद झालं तर आम्ही जगायचं तरी कसं. तेव्हा काळजी नका करू संचारबंदीत कोणत्या गोष्टी सुरु राहणार याबाबतही मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे. चला तर पाहुयात संचारबंदीत कोणत्या गोष्टी सुरु राहणार आहेत ते-
१)जीवनावश्यक वस्तूंची दुकानं
२)किराणाची दुकानं
३)शेती निगडीत औषधांची दुकानं सुरु राहणार
४)अन्न धान्य तसेच त्यांची ने-आण करणारी वाहने सुरु राहतील.
५)औषधांची दुकानं
६)पशू खाद्याची दुकान तसेच पशूंचे दवाखानेही उघडे राहतील.
८)दूध आणि दुग्धजन्य पदार्थ
९)दवाखाने, रुग्णालयं
१०)कृषीमालाशी सबंधित वाहतूक सुरु राहील.
११)केवळ अत्यावश्यक परिस्थितीत एक प्रवासी क्षमता वाहून नेण्याची रिक्षांना परवानगी.
१२)अत्यावश्यक परिस्थितीत कॅब किंवा टॅक्सिमध्ये फक्त २ प्रवासी नेण्याची परवानगी.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.